Share

तुम्ही तर भुकेल्या माणसासमोर जेवणावर ताव मारताय’; अन्नू कपूर यांनी सेलिब्रिटींनी सुनावले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. याची खबरदारी म्हणून काही ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले तर काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले. अशा परिस्थितीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी गरजू व्यक्तिना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.  तर दुसरीकडे संपूर्ण देश बिकट परिस्थितीचा सामना करत असताना अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियावर सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे फोटो शेअर करताना दिसत होते. आता अभिनेते अन्नू कपूर यांनी व्हेकेशन फोटो शेअर करणाऱ्या सेलिब्रिटींवर संताप व्यक्त केला आहे.

अन्नू कपूर यांनी व्हेकेशन फोटो शेअर करणाऱ्यांना सुनावले आहे. ‘तुम्ही सुट्टी घ्या, त्याचा आनंद देखील घ्या. मला यामुळे कोणतीही समस्या नाही. पण संपूर्ण देश कोरोनासारख्या महामारीशी लढत असताना सेलिब्रिटींनी व्हेकेशनचे फोटो शेअर करणे मला अजिबात आवडलेले नाही. तुम्ही तर भुकेल्या माणसासमोर ५६ पंचपक्वान असलेल्या थाळीवर ताव मारत आहात’ असे त्यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/annukapoor_/status/1385468466157682691?s=20

पुढे ते म्हणाले, ‘माहिती आहे तुम्हाला हे परवडण्यासारखे आहे, माहिती आहे तुमच्याकडे पैसा आहे. तुम्ही आणखी काय दाखवू इच्छिता? पण हे असे वागणे योग्य नाही. सेलिब्रिटींनी थोडे संवेदनशील असलायला हवे आणि सहानुभूती दाखवायला हवी.’ यापूर्वी अन्नू कपूर यांनी ट्वीट करत सुनावले होते. ‘श्रीमंत, सेलिब्रिटी आणि मीडियाला विनंती करतो की परदेशात जाऊन सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करु नका. कारण सध्या संपूर्ण देश या महामारीचा सामना करत आहे’ असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!