Share

तुमचा आमच्यावर राग आहे मात्र भविष्यात चूक सुधारण्याची संधी द्या – उद्धव ठाकरे  

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : आज शहरात एमआयएमचा जो प्रभाव आहे तो काढून टाका. यापूर्वी जे घडले त्यावरून तुमचा आमच्यावर राग आहे. मात्र भविष्यात चूक सुधारण्याची संधी द्या. झालेली चूक सुधारण्याची जबाबदारी माझी आहे. मतदान करताना पुढच्या पिढीचादेखील विचार करा. राग व्यक्त करताना आपण कोणाला मदत करत आहोत हे पण नक्की पहा.असे आवाहन शिवसेनापक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी गुरूवारी अमरावतीतील  मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील सभेत केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात ठाकरे यांच्यातीन सभा झाल्या . यात शेवटची सभा त्यांनी औरंगाबादेत घेतली. यावेळी ठाकरे म्हणाले, ” दिल्लीत औरंगाबादचा एकही  खासदार नाही, आपल्या रागाची मला कल्पना आहे. चुका झाल्या तर तुम्ही  कान ओढा, मीही कान उपटल्या शिवाय राहणार नाही. ”  आधी शहरात कचऱ्याचा, पाण्याचा  प्रश्न होता. आता तोही सुटला आहे. पाण्यासाठी १६८०कोटी रुपये मंजूर केले आहेत.  सरकार आले की स्वच्छ पाणी मिळणार. गेले पाच वर्ष अनुभव गोळा करण्यात गेले.” तसेच  शिवसेना-भाजपातील संबंध कसे आहेत ते प्रत्येकाला माहित आहे. जबरदस्तीने होणारा विकास परवडणारा नाही. या शहरात जसा कचऱ्याचा प्रश्न होता. तसा  उद्योगधंदे, बेरोजगारी आणि शिक्षणाचाही आहे. मात्र  सरकार आल्यावर अनेक विकासाच्या योजना राबविण्यात येतील.  असे म्हणत ठाकरे यांनी औरंगाबाद करांना आश्वासित केले.

दरम्यान त्यांनी राष्ट्रवादीवरही निशाणा साधला. ”अजित पवार म्हणतात, ५ वर्ष झोपले होतात काय. पण आम्ही  झोपलो नव्हतो तुमची  नाटकच  पाहत होतो. तर  सुशीलकुमार म्हणातात, थकलो आहोत. आता टीका करायची तर कुणावर करायची. शिवसेनाप्रमुख म्हणायचे, तेव्हाचे नेते समोर आले की आदर वाटायचा. आताचे नेते समोर आल्यावर शरमेने मान खाली जाते. आता शरद पवारही म्हणतात ” सरकार पाडल्याविना राहणार नाही,  पवार तुम्ही वयाने मोठे आहात. सरकार पाडण्याचा दांडगा अनुभव आहे. वसंतदादांचे सरकार आपण पाडले होते, हे आम्हाला  माहिती आहे. आम्ही तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. कारण हे सरकारच जाणार नाही. ” असेही ठाकरे यांनी यावेळी नमूद केले.

महत्त्वाच्या बातम्या : 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182545554070364163?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182546689304842240?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!