Share

गृहमंत्री देशमुखसाहेब तुम्ही मुख्यमंत्री आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करणार का ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णाचे नाव हे गुपित ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र याची पायमल्ली खुद्द सरकार कडूनच होत आहे. यावर गृहमंत्री अनिल देशमुख कारवाई करणार का ? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या फेसबुक लाईवद्वारे 6 महिन्याच्या चिमुरडीचे नाव घेतले होते. त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्रकाराचे नाव घेत तो कोरोनाबाधित असल्याची माहिती दिली होती. तर जितेंद्र आव्हाड हे कोरोनाबाधित असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते मिलिंद पाटील यांनी दिली होती. या सर्वांनी नियमाचे उल्लंघन केले आहे. यावर आता अनिल देशमुख कारवाई करणार का ? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला आहे.

हा सवाल किरीट सोमय्या यांनी आपल्या व्हिडीओ आणि पत्रकामधून उपस्थित केला आहे. तर एका वृत्त वाहिनीने कोरोनाबाधिताचे नाव प्रसिद्ध केलं होत यावर कारवाई करण्यात आली होती. मग आता गृहमंत्री अनिल देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करणार का ? असे सोमय्या यांनी विचारले आहे.

याआधी देखील किरीट सोमय्या यांनी वाधवान प्रकरणावरून  राज्य सरकारवर हल्ला चढवला होता. तर अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती.

…अस झालं तर उद्धव ठाकरेंना द्यावा लागणार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा | Can CM Gives His Resign ?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!