🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : पुन्हा सत्तेत आल्यावर महाविद्यालयीन शिक्षण मोफत देणार,”अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात प्रचारादरम्यान केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय नेते महाराष्ट्रातील मतदार संघ पिंजून काढत आहेत. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनीही प्रचार सभांचा धडाका लावला आहे. दरम्यान मराठवाड्यात प्रचारादरम्यान ठाकरे यांनी महाविद्यालयीन शिक्षणाबाबत मोठी घोषणा केली आहे.
निवडणुकीचा प्रचाराला रंगत चढू सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. भाजपाचे अध्यक्ष अमित शाह, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी स्वतःला प्रचारात कोणतीही कसर सोडलेली दिसत नाही. दरम्यान, उद्धव ठाकरे हे गुरूवारी (ता. १०) मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना औरंगाबाद, वैजापूर, कन्नड आणि घनसावंगीत त्यांच्या प्रचार सभा झाल्या. यावेळी बोलताना ठाकरे त्यांनी “अनेक विद्यार्थी हुशार आहेत. पण गरिबीमुळे ते महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकत नाही. आम्ही पुन्हा सत्तेत आल्यावर या गरीब विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन शिक्षण मोफत देणार,”अशी घोषणा ठाकरे यांनी केली.
तसेच, युतीचा धर्म पाळताना निष्ठावंतावर झालेल्या अन्यायासाठी मी त्यांची माफी मागतो. त्यांची मी माफी मागण्यात चुकीचे काही नाही. औरंगाबादमध्ये एक गट उपोषणाला बसला असताना मी तेथे जाऊन गुडघ्यावर बसून त्यांचं म्हणणं मी ऐकलं. तर लगेच दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांसमोर गुडघे टेकले अशी बातमी आली. अरे ही माझी माणसं आहेत मग मी शिवसैनिकांसमोर गुडघेच काय मी डोकंही टेकवेन.”असं ठाकरे यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1182543372642209792?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182541555355152385?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

