Share

आता डिसले गुरुजी आमदार होणार? दरेकर करणार शिफारस

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना दिला जाणार आहे. महाराष्ट्राच्या सोलापूर मधील रणजितसिंह डिसले यांच्या नावाची काल शिक्षण क्षेत्रातील नोबेल पुरस्कार अशी ओळख असणार्‍या मानाच्या ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी घोषणा झाल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

‘ग्लोबल टीचर प्राईज’ प्राप्त केलेल्या बार्शीतील रणजितसिंह डिसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बार्शीत येऊन डिसले यांचा आज सन्मान केला. इतर शिक्षकांनी त्यांचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीची कामगिरी डिसले सरांची आहे. रणजित डिसले यांची विधानपरिषदेच्या 12 जागांपैकी एक जागेसाठी शिफारस करू, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील फोनद्वारे डिसले गुरुजींचे अभिनंदन केले. राज्याच्या विधीमंडळामध्ये डिसले सरांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती देखील प्रवीण दरेकर यांनी दिली. दरेकर म्हणाले की, राज्यात नुकत्याच विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठी निवडणूक झाल्या.

यामध्ये शिक्षक नसलेला व्यक्ती शिक्षक आमदार होतो हेच देशाचे दुर्दैव आहे, अशी टीका त्यांनी केली. रणजित डिसले यांची विधानपरिषदेच्या 12 जागांपैकी एक जागेसाठी शिफारस करू. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलून शिफारशीचे पत्र देऊ असे आश्वासन विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी यावेळी दिले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!