मुंबई: एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांच्यातील वादामुळे सध्या समीर वानखेडे जाम चर्चेत आहेत. आदर्म्यान आज समीर वानखेडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने (Kranti Redkar) सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे.
‘समीर वानखेडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी नेहमी तुमच्याबद्दल आणि तुमच्या शौर्याचं वर्णन करण्यासाठी खूप काही लिहिते, परंतु आज शब्द कमी पडत आहेत. देशातील अमली पदार्थांशी निगडीत दुष्टांशी लढा देणं ही एक गोष्ट आहे, परंतु तुमच्या या मोहिमेत तुम्हाला रोखणाऱ्या सर्वांविरुद्ध लढा देणं हा एक मोठा संघर्ष आहे. या संघर्षाचा तुम्ही दररोज सामना करत आहात आणि त्यावर दररोज तुम्ही मात करत आहात. तुम्ही खूप चांगलं काम करत आहात, समाजातील घाण दूर करत आहात, तरुणांना योग्य मार्ग दाखवत आहात, त्यांच्या भल्यासाठी काम करत आहात (आता कदाचित त्यांना ही बाब समजणार नाही). तुमच्यावर जनतेचा आशीर्वाद आहे. सामान्य माणूस हा खूप हुशार आहे. योग्य काय अयोग्य काय, कोण खोटं आणि कोण खरं हे त्याला बरोबर माहित असतं. तुम्ही फक्त काम करत राहा, अखंडता कशी दिसते ते जगाला दाखवा. जे लोक खरोखरच आपल्या समाजाची काळजी घेतात, आपल्या राष्ट्रावर प्रेम करतात आणि तुमच्यावर प्रेम करतात तेच लोक महत्त्वाचे आहेत’, अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
https://www.facebook.com/OfficialKrantiRedkar/
दरम्यान या पोस्टद्वारे क्रांती रेडकरने समीर वानखेडे यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना धीर दिला आहे. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपानंतरही क्रांतीने खंबीरपणे वानखेडे यांना साथ देत नवाब मलिक यांना सडेतोड उत्तर दिले आहे. त्यातच आता तिची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘विचारांची वीज कोसळावी तसे राहुल गांधींनी हिंदू राज्य आणण्याचा बार उडवला’
- सामाजिक एकोप्यातून देशाची प्रगती-चंद्रकांत खैरे
- आगामी महापालिका निवडणुकीत सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार काय? राज ठाकरे म्हणतात…
- आगामी महापालिका निवडणुकीत सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार काय? राज ठाकरे म्हणतात…
- कतरिनाच्या भावाचं ‘या’ मराठमोळया अभिनेत्रीने चोरलं काळीज

