Share

भाजपविरोधी पक्षांवरच आयकर विभागाने कारवाई का केली – कॉंग्रेस

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी राज्यभर सुरु आहे. त्यात भाजपासह विरोधी पक्ष आणि घटक पक्षांच्या प्रचारसभांना रंग चढले आहेत. मात्र काल (ता. १२ ) अचानक आयकर विभागाने कॉंग्रेसच्या दिल्लीतील कार्यालयाच्या लेखा विभागावर छापे टाकून विभागाला टाळे लावले आहे. ऐन प्रचाराच्या काळात ही कारवाई केल्याने सरकारने भाजपला विरोध करणाऱ्या पक्षांवरच सूडबुद्धीने ही कारवाई केली असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.

दिल्लीतील २४ अकबर रोडवरील कॉंग्रेसच्या मुख्यालयातील लेखा विभागावर आयकर विभागाने छापे टाकले. लेखा विभागाचे गेल्या चाळीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची कालपासून चौकशी करण्यात येत आहे. शिवाय त्यांच्या नातेवाईकांचीही चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे संतापलेल्या कॉंग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे. कॉंग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी ” लोकसभा निवडणुकीवर चाळीस हजार कोटी रुपये खर्च करणाऱ्या भाजपकडे पैसा कुठून आला, याबाबत प्राप्तीकर खाते कोणतीही चौकशी करत नाही. मात्र ऐन निवडणुकीच्या काळातच कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीच्याच कार्यालयावर हे छापे का टाकण्यात आले. असा प्रश्न शर्मा यांनी विचारला आहे. या देशात विरोधकांसाठी एक आणि भाजपसाठी दुसरी अशा दोन नियमावली, दोन कायदे आणि दोन घटना आहेत. ही देशाच्या लोकशाहीसाठी शरमेची बाब आहे,’

सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष आणि नेत्यांना लक्ष्य करून त्यांच्यात भयाचे वातावरण निर्माण करणे हे मोदी सरकारची नीयत खराब असल्याचे त्यातून स्पष्ट होते. मोदी सरकारने सत्तेचा दुरुपयोग करून सर्व संस्था आणि राजकीय विरोधकांना लक्ष्य करत आहे. विरोधी पक्षाच्या कार्यालयावर छापे घालून त्याच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करणे, त्यांच्या नातेवाईकांची चौकशी करून त्यांच्यात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. लोकसभा निवडणुकीतील खर्चांचे सर्व आकडे निवडणूक आयोगापुढे आहेत. या निवडणुकीत ६० हजार कोटींचा खर्च झाल्याचे निष्कर्ष अनेक स्वतंत्र संस्थांनी काढले असून, त्यातले ४० हजार कोटी रुपये भाजपने खर्च केले आहेत. मात्र इतका पैसा आला कोठून हे विचारणारे एकही सरकारी खाते नाही का असे कॉंग्रेसचे नेते शर्मा यांनी विचारले आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या काळात पक्षाचा प्रचार आणि उमेदवारांसाठी लागणारा निधीही खर्च करण्यापासून काँग्रेस पक्षाला रोखले जात आहे. जे देशातील बँकांना लुटून परदेशात खुलेपणाने फिरत आहेत, त्यांच्याबाबत मोदी सरकार कोणतीही कारवाई करत नाही. हा देशाच्या राजकारणासाठी अतिशय चिंतेचा विषय आहे. या कारवाईतून काही निवडक राजकीय विरोधकांना लक्ष केले जात आहे. हे फक्त केवळ कॉंग्रेस आणि कॉंग्रेस नेत्यांसोबतच केलं जात नसून भाजपाविरोधी कॉंग्रेससह तृणमूल, टीडीपी, बसपा, सपा या पक्षांच्या नेत्यांनाही त्रास दिला जात असल्याचा आरोप शर्मा यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!