🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘राधे’ हा १३ मे रोजी ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित झाला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित न होता डिजीटल प्लॅटफॉर्म झी-फाईव्ह आणि झी-फ्लेक्स वर प्रदर्शित झाला मात्र काही तासांतच ऑनलाईन लीक झाला. सिनेमाची पायरेटेड कॉपी अगदी व्हॉट्सअॅप व अन्य सोशल मीडिया माध्यमांवर व्हायरल झाली. याविरोधात झी ५ ने हायकोर्टात धाव घेतली. यावर आता हायकोर्टाने कडक निर्देश दिले आहेत.
‘राधे’ची पायरेटेड कॉपी आणि विविध व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये पसरवल्या जात आहेत, असा आरोप झी-५ ने आपल्या याचिकेत केला होता. यावर हायकोर्टाने उपरोक्त निर्देश दिले आहेत. चित्रपट बेकायदेशीरपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यावर बंदी आणण्याचे हायकोर्टाने म्हटले आहे.
सुनावणी दरम्यान, दिल्ली हायकोर्टाने भाईजानच्या सिनेमाची पायरेटेड कॉपी विकणा-या युजर्सची सर्व्हिस बंद करण्याचे निर्देश व्हाट्सअॅपला दिले आहेत. एअरटेल, जिओ, वोडाफोन या देशातील सर्व प्रमुख टेलिकॉम ऑटरेटर्सलाही पायरसी करणा-या ग्राहकांची माहिती देण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. यावरुन आता झी ५ या ग्राहकांविरूद्ध कायदेशीर कारवाई करणार आहे.
काही दिवसांपूर्वीच सलमानने प्रेक्षकांना ‘राधे’ प्रेक्षकांनी योग्य प्लॅटफॉर्मवर सिनेमा पहावा अशी विनंती केली सलमानने आधीच केली होती. मात्र त्यानंतरही अनेक प्रेक्षकांनी बेकायदेशीर रित्या काही वेबसाईटवर उपलब्ध असलेला सिनेमा पाहिल्याने पायरसीचा भाग बनू नका़ नाहीतर सायबर सेल तुमच्यावर कारवाई करेल,अशी ताकिदच त्याने दिली होती आणि आता अखेर हायकोर्टानेच याबाबत कडक निर्देश दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- विराट नंतर आता कोरोनाचा सामना करण्यासाठी RCB तयार; करणार इतक्या कोटींची मदत
- ‘आता मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा तसेच मातोश्रीवर शांतीयज्ञ करण्याची गरज आहे
- ‘कितीही कारवाई करा, १ जूननंतर आम्ही दुकानं उघडणारच’, खा.जलील यांचा ठाकरे सरकारला इशारा
- ‘नऊ दिवसानंतरही वादळग्रस्तांना शासनाकडून मदत नाहीच,वीज, पाणी या मूलभूत गरजांपासून नागरिक वंचित’
- महिला व बालकल्याण समितीच्या सतर्कतेमुळे अंबाजोगाईत होणारा बालविवाह रोखण्यात यश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

