Share

हे काय ? सनी लिओनीच्या ड्रेसची चेन झाली खराब; संपूर्ण टीम आली मदतीला

Published On: 

🕒 1 min read

केरळ : अभिनेत्री सनी लिओनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यापासून चर्चा आहे. तिच्या हटके लुकमुळे ती ओळखली जाते. सनी लिओनी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सनीचे लाखो चाहते आहेत. ती नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सनीने आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

https://www.instagram.com/tv/CPM8V49jHde/?utm_source=ig_embed&ig_rid=a2cdc96e-4f63-42eb-be4a-81d575de63c6&ig_mid=3BCE1726-C253-45D9-A44F-EE236E2A7577

सनीने स्वत: एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. ‘स्पिल्ट्स व्हिला’ या शो दरम्यानचा हा व्हिडीओ असून यात सनीने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. मात्र, या ड्रेसची फिटींग व्यवस्थीत नसल्याने सनीची संपूर्ण टीम ते ठीक करण्याचा प्रयत्न करत आहे. सनीच्या ड्रेसची चेन खराब झाली आहे. बरेच प्रयत्न करुनही ती चेन बंद होऊ शकली नाही. “एक ड्रेस फीट होण्यासाठी संपूर्ण टीमची गरज लागते”, असे कॅप्शन देत सनीने तो व्हिडीओ शेअर केला आहे. सनीने स्वत: हा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रींना सेटवर कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते ते दाखवले आहे.

सनी सध्या केरळमध्ये एमटिव्ही वरील ‘स्पिल्ट्स व्हिला’ या शोच्या चित्रकरणात व्यस्त आहे. सनी कॉमेडी हॉरर चित्रपट ‘कोका कोला’, ‘रंगीला’ आणि ‘वीरम्मादेवी’ या चित्रपटात दिसणार आहे. त्यानंतर सनी लवकरच ‘अनामिका’ या चित्रपटात दिसणार आहे. सनी सोशल मिडियावर तिच्या मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर करत असते. मात्र सध्या तिच्या या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू असून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!