Share

‘सरकार काँग्रेसच्या बळावर पण उपयोग काय ? सरकारमध्ये त्यांना विचारतय कोण?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारमधील काँग्रेसचे स्थान याविषयी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सडेतोडपणे काँग्रेसची भूमिका मांडली. ‘यापूर्वीही अनेकदा आम्ही सांगितले आहे की हे सरकार आमच्यामुळे आहे, सरकारमुळे आम्ही नाही. तेच आमच्या नेत्यांनीही सांगितले आहे. सरकारमध्ये आमची खूप सारी भागीदारी नाही. पण सगळ्यांचा समान विकास व्हायला हवा. किमान समान कार्यक्रमाच्या आधारावरच उद्धवजी किंवा अजित पवार यांच्यासोबत आमचे नाते जोडले गेले आहे’, असे पटोले म्हणाले.

यावर आता भाजपने टोला लगावला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करून महाविकास आघाडीवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. नाना पटोलेजी, तुम्ही वाफा दवडवा इतर दोन सरकार चालवित आहेत. सरकार काँग्रेसच्या बळावर पण उपयोग काय नानाजी? सरकारमध्ये कॉग्रेसला विचारतय कोण? काँग्रेस मागण्या करते दोन्ही पक्ष लक्षही देत नाहीत. एवढंच काय.सोनिया गांधींनी पत्र लिहिले उपयोग तरी शून्य, असे म्हणत नाना पटोलेंना उपाध्ये यांनी टोला लगावला आहे.

दरम्यान, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडीचे सरकार आहे. सत्तेत जरी काँग्रेस सहभागी झाली असली, तरी काँग्रेस अनेक वेळा नाराजी व्यक्त करतानाही दिसली. याच मुद्द्यावर नाना पटोले यांनी या मुलाखतीत भाष्य केले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!