🕒 1 min read
नांदेड: जिल्ह्यात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. तसेच ऑक्सिजन अभावी रुग्णांचे हाल होत असून मुत्यु होत आहे आणि आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याने पी.एम. केअर फंडातून ऑक्सिजन निर्मितीचे दोन प्लांट उभरण्यात येणार आहेत, अशी माहिती खा. चिखलीकर यांनी दिली. दरम्यान जिल्ह्यात लसीचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडत असल्याने नागरिकांचे हाल होत असून लस कधी उपलब्ध होणार, असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा गतीमान करुन आरोग्यसेवा दर्जेदार करत रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा मुबलक करण्यासाठी खा. चिखलीकर यांच्या प्रयत्नातून २ ऑक्सिजन प्लांट मंजूर झाले आहेत. त्यापैकी एक प्लांट श्री गुरुगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयात ३० मे पर्यंत सुरु होणार आहे. दुसरा प्लांट शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी येथे दि. ३० जून पर्यंत सुरु होणार आहे. वरील दोन्ही प्लांट हे पी.एम.केअर फंडातून मंजूर करण्यात आले आहेत. त्यासाठी अंदाजे अडीच कोटी रुपये खर्च होणार आहेत, असे खा. चिखलीकर यांनी सांगितले.
या दोन्ही प्लांटमुळे नांदेड जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होणार नाही. आरोग्य सेवा अधिक दर्जेदार आणि रुग्णांच्या फायद्याची ठरणार असल्याचे खा.चिखलीकर यांनी सांगितले. दरम्यान यावेळी जिल्ह्यात लसीचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडत आहे त्यामुळे नागरिकांचे हाल होत असून लसचा साठा कधी उपलब्ध होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- आशुतोष राणांनी अनोख्या पद्धतीने केल रेणुका शहाणे यांना प्रपोज; अशी आहे लव्हस्टोरी
- मोठी बातमी : दहावीच्या परीक्षांसह अकरावी प्रवेशाबाबत राज्य सरकार जीआर काढण्याची शक्यता !
- ‘ “रेनिसान्स स्टेट” या पुस्तकावर देशभरात कायमची बंदी घाला आणि विक्री झालेली पुस्तकं…’
- उस्मानाबादेत सूट द्यायलाच उशीर की लगेच तौबा गर्दी
- ‘राधे’ चित्रपटाची पायरेटेड कॉपी विकणा-यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकांवर येणार बंदी; हायकोर्टाचे कडक निर्देश


