🕒 1 min read
नवी दिल्ली : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या डान्ससाठी ओळखली जाते. आजकाल ती स्वत: ला अलग ठेवूनही सोशल मीडियावर सतत अॅक्टिव दिसत आहे. अलीकडेच अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती आपल्या मुलाला कथक शिकवताना दिसत आहे. माधुरी दीक्षितचा हा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
माधुरी दीक्षित तिच्या व्हिडिओमध्ये तिच्या मुलाला कथकची प्रत्येक स्टेप शिकवताना दिसत आहे. तर माधुरीचा मुलगा देखील कथक नृत्य करण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओमध्ये, माधुरी एक संपूर्ण शिक्षक म्हणून दिसत आहे, तर तिचा मुलगा एका चांगल्या विद्यार्थ्याप्रमाणे नृत्य करण्यास शिकत आहेत.याआधीही माधुरी दीक्षितने तिचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यात ती घरी एकतर जिम किंवा डान्स करताना दिसली आहे.
https://www.instagram.com/p/B-9KrfpnSPK/?utm_source=ig_embed
दरम्यान कोरोनामुळे अनेक कलाकर घरात आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवत आहेत. तर घरात राहून सुरक्षित रहावे असे आवाहन सर्व कलाकारांनी आपल्या चाहत्यांसाठी केले आहे. सलमान खानने तर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.
डॉक्टर व नर्सेस तुमचे प्राण वाचवत आहेत आणि तुम्ही त्यांच्यावर दगडफेक करताय. करोना पॉझिटिव्ह रुग्णालयातून पळून जात आहेत. कोणत्या दिशेला पळताय तुम्ही? मृत्यूकडे की जीवनाकडे? जर हे डॉक्टर तुमचा उपचार करत नसते आणि पोलीस रस्त्यांवर सुरक्षेसाठी नसते तर काही लोक (ज्यांना असं वाटतं की आम्हाला करोना होणार नाही) देशाच्या अनेक लोकांसोबत आपलेही प्राण गमावून बसतील. ज्यांच्याकडे दोन वेळचं पोट भरायला जेवण नाहीये, मुलांचं पोट भरण्यासाठी अन्न नाही, त्यांना मी सलाम करतो. कारण त्यांनाही हे ठाऊक आहे की कुटुंबीयांना गमावण्यापेक्षा ही वेळ निघून जाणं योग्य आहे, असे म्हणत सलमानने चांगलेच कान टोचले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

