औरंगाबाद : शहराच्या स्मार्ट सिटी सीईओ पदी काही दिवसापुर्वी नगर विकास विभागाने बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्ती केली होती. पण माजी खासदार चंद्रकात खैरे तसेच माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सीईओ पदी मनपा आयुक्त पांडेय रहावे अशी मागणी केल्यानंतर पालकमंत्र्यानी मनोहरे यांच्या नियुक्तीवर स्थगिती आणली. पण गुरुवारी शहरात येऊन आपण स्मार्ट सिटीच्या सीईओपदी रुजु होत आहोत असे पत्र बाबासाहेब मनोहरे यांनी मनपा आयु्क्त आणि जिल्हाधिकारी यांना पाठवले.
मनपा आयुक्त हे मागील ५ वर्षापासुन स्मार्ट सिटीचे सीईओ म्हणुन काम पाहत आहे. विद्यमान सीईओ तथा मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय चांगल्या पद्धतीने कामकाज पाहत आहेत. महाराष्ट्रात आणि देशपातळीवर स्मार्ट सिटीला टॉप टेनमध्ये यशस्वीरीत्या आणण्याचे प्रयत्न त्यांनी केले आहे. पण अचानक आयएएस आधिकारी नसलेल्या बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्ती कशी झाली असा प्रश्न पडला होता. हा वाद थेट पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यापर्यंत जाउन पोहोचला.
पालकमंत्री सुभाष देसाई यांनी तत्काळ मनोहरे यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली. मात्र गुरुवारी मनोहरे हे शहरात दाखल झाले. मनोहरे यांनी शासन आदेशानुसार आपण स्मार्ट सिटीच्या सीईओ पदी रुजू होत आहोत असे पत्र जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांना पाठवले. याबाबत मनपा आयुक्त पांडेय यांनी सीईओपदावर नियुक्तीसंदर्भात पालकमंत्री सुभाष देसाई यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे या पदावर कोणीही रुजू झालेले नाही, असे सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- खंडपीठाची दिशाभूल; नगर परिषदेच्या सीओसह 4 अधिकाऱ्यांना प्रत्येकी एक लाखांचा दंड
- ‘राजे’ तुमच्या विचारांचे पालन करणार, चिमुकल्यांचा शिवजयंती दिनी निर्धार
- अर्जुन तेंडुलकरच्या निवडीनंतर बहीण साराची प्रतिक्रिया
- लघुशंकेसाठी थांबलेल्या व्यक्तीच्या पाठीवर चाकूने वार; दीड लाख रुपयांची रक्कम लंपास
- ‘अपूनही भगवान हैं’, RCB ने मॅक्सवेलला १४.२५ कोटीत खरेदी केल्यानंरत मिम्सचा पाऊस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

