Share

निष्ठा नसणाऱ्यांना मतदार जागा दाखवतील

Published On: 

🕒 1 min read

मावळ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी नेत्यांनी उमेदवारी मिळावी यासाठी पक्षांतर केले. असेचं पक्षांतर मावळ मतदारसंघातही पाहिला मिळाले. भाजपचेचं विद्यमान आ. बाळा भेगडे यांचेचं सहकारी सुनील शेळके यांनी उमेदवारी मिळावी यासाठी पक्षांतर करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा हाती घेतला. हाच धागा पकडत बाळा भेगडे यांनी निष्ठा नसणाऱ्यांना मतदार जागा दाखवतील, असे म्हणत शेळके यांना टोला लगावला आहे.आंदर मावळमध्ये बाळा भेगडे यांचे पारंपारिक पद्धतीने नागरिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

भेगडे म्हणाले की, छत्रपतींचा मावळा आहे त्यामुळे अंगात निष्ठा आहे आणि पक्षाबरोबर एकनिष्ठ आहे. ज्यांच्या अंगात निष्ठा नाही त्यांना मावळ मधील मतदार योग्य वाट दाखविल्याशिवाय राहणार नाही. तसेच मावळात होणारा पहिलाच प्रचार असा आहे की ज्यामध्ये विरोधी पार्टीला जास्त महत्व न देता आपण करीत असलेल्या आणि पुढे करणार असणाऱ्या विकासकामांना जास्त महत्व दिले जात आहे.

दरम्यान वाउंड, कचरेवाडी, देशमुखवाडी, घोणशेत, खरमरवस्ती, टाकवे बु, फळने, माऊ, वडेश्वर, नागथली, वाहनगाव, बोरवली, तळपेवाडी आदि गावांमध्ये भेगडे यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. स्वतः गावकरीही भेगडे यांनी केलेल्या कामाची व गावातील नागरिकांना झालेल्या फायद्याची यादी वाचून दाखवत आहेत. त्यामुळे मावळात यंदा विकासाच्या मुद्यांवर निवडणूक लढवली जात असल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1182636503861587968?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182626003102756864?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182625501011070978?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!