🕒 1 min read
मुंबई : आयपीएलची स्पर्धा स्थगित झाल्याननंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मासह समाजिक कार्यात हातभार लावत आहे. कोरोनामुळे आयपीएल रद्द झाल्यानंतर विराटने कोरोना बचाव कार्यात आपले लक्ष केंद्रीत केले आहे.
कोविड १९ रिलीफ मदतीसाठी अनुष्का आणि विराट यांनी केट्टो (Ketto) वर एक मोहीम सुरू केली. त्यावर प्रत्येकाने जमेल तेवढ्या पैशाचे योगदान करावे असे आवाहन देखील केले. कोणतीही रक्कम जीव वाचवण्यासाठी कमी नाही. परंतु या संघर्षासाठी आम्हाला आपल्या मदतीची आवश्यकता आहे. या मोहिमेत सर्वांना सहभागी होण्याची विनंती अनुष्का आणि विराट यांनी केली होती.
त्यांच्या या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळाला ७ कोटींचा निधी जमा करण्याचे लक्ष्य विरुष्कानं डोळ्यासमोर ठेवले होते. आणि काही दिवसातच या दोघांनी कोरोनाच्या लढाईसाठी 11 कोटी रुपये जमा केले आहेत. स्वत: विराट कोहली आणि अनुष्का शर्माने या अभियानासाठी दोन कोटी रुपये दिले होते. आता पुन्हा एकदा अनुष्का आणि विराट चर्चेत आले आहेत. हैदराबाद येथील दोन वर्षांच्या मुलाला दुर्मिळ आजार झाला आहे आणि त्यावरील उपचारासाठी त्याला १६ कोटींची गरज आहे. विराट-अनुष्का यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
बॉलिवूड सेलिब्रेटी राजकुमार राव यानं मागील महिन्यात एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यानं आयांश याला जगातील सर्वात महागड्या औषधाची गरज आहे. तुम्ही त्याची अखेरची आशा आहात. त्याला मदत करा, असे आवाहन केलं होतं. त्यानंतर आलिया भट, अजय देवगण, कार्तिक आर्यन, अनिल कपूर, श्रद्धा कपूर, सारा अली खान, अर्जुन कपूर आदींनी मदत केली. या लिस्टमध्ये आता विराट-अनुष्काचे नावही सामील झाले आहे. आयांश गुप्ता असे या दोन वर्षांच्या मुलाचे नाव आहे. त्याला पाठीच्या स्नायूचा दुर्मिळ आजार झाला आहे. जगातील १० हजार मुलांमधील १ मुलामध्ये हा आजार आढळतो.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर असल्याची माहिती
- ‘राहुल गांधी चांगले विरोधी पक्षनेते होऊ शकतात पंतप्रधान नाही’ : जावेद अख्तर
- ‘पंतप्रधान मोदींना वाटतं मराठा आरक्षण हा राज्याचा विषय, त्यामुळेच ते संभाजीराजेंना भेटले नाहीत’
- अमृता सिंगसोबत साखरपुड्यानंतर मोडले होते रवी शास्त्री यांचे लग्न
- ‘राज्य सरकार आमच्यामुळे आहे, सरकारमुळे आम्ही नाही’, काँग्रेसचा सेना, राष्ट्रवादीला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

