Share

अतिआवश्यक नसलेल्या विकासकामांचा निधी कोरोनाच्या उपाययोजनांसाठी वळवावा : विनायक मेटे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अतिआवश्यक नसलेल्या विकासकामांचा निधी कोरोनाच्या उपाययोजनांसाठी वळवण्यात यावा अशी विनंती शिवसंग्राम पक्षाचे आ. विनायक मेटे यांनी केली आहे. विनायक मेटे यांनी ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहित केली आहे.

त्यात मेटे यांनी असे नमूद केले आहे की, शासनाच्या ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय, आदिवासी विकास अशा विविध विभागांनी १५ ते ३१ मार्चच्या काळात साधारण आठ ते दहा हजार कोटी रुपयांच्या विकास कामे हाती घेतली आहेत. यासर्व निधीमधील अत्यंत महत्वाचे कामे फक्त १० ते १५ टक्केच असू शकतील. बाकी सर्व कामे एकवर्षाच्या नंतर केले तरीही काहीही अडचण येऊ शकणार नाही. त्यामुळे हा अतिआवश्यक नसलेल्या विकासकामांचा निधी कोरोनाच्या उपाययोजनांसाठी वळवण्यात यावा.

https://www.facebook.com/VinayakMeteOfficial/posts/1383996575128043

तसेच शासकीय कर्मचारी – अधिकारी यांचे पगार कपात किंवा दोन टप्प्यांमध्ये देत असल्याचा उल्लेख करत राज्याची आर्थिक स्थिती पाहून हे योग्यही असू शकेल. पण दुसऱ्या बाजूला मात्र वेगवेगळ्या विभागांना हजारो आणि शेकडो कोटींचा निधी वितरित करण्यात येत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आवश्यक नसणाऱ्या कामास स्थगिती देऊन त्याचा निधी राज्य शासनाने कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी वळवावा. त्याचबरोबर लोकप्रतिनिधीसाठी दिलेला निधी थांबविण्याची मागणीही मेटे यांनी आपल्या पत्रात केली आहे. व्हिडीओच्या माध्यमातून देखील मेटे यांनी आपले मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे व्यक्त केले आहे.

महाराष्ट्राचे अफलातून आणि दिलखुलास माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब भोसले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!