Share

वांद्रे गर्दी प्रकरण : उत्तर भारतीय संघटनेचा नेता विनय दुबेला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Published On: 

मुंबई : मुंबईतील वांद्रे गर्दी प्रकरणी विनय दुबेला अटक करण्यात आली होतीच. आता कोर्टाने त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. करोनाचा मुकाबला करण्यासाठी देशभरात लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. अशात मंगळवारी मुंबईतील वांद्रे स्टेशनच्या बाहेर हजारो मजूर गावी जाण्यासाठी जमले होते.

हे प्रकरण समोर आल्यानंतर उत्तर भारतीय संघटनेचा अध्यक्ष विनय दुबे याच्याविरोधात संतापाची लाट उसळली होती. दुबे याने यासंदर्भातलं आवाहन केलं होतं. त्यामुळे विनय दुबेला अटक करण्यात आली होती. आता कोर्टाने त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास वांद्रे स्थानकाबाहेर परप्रांतीयांचा जमाव झाल्याचं पाहायला मिळालं होतं. हजारोंच्या संख्येनं परप्रांतीय या ठिकाणी जमले होते. तसंच त्यांनी आपापल्या घरी जाऊन देण्याची मागणी केली होती. दरम्यान, ही वांद्र्यातील घटना पूर्वनियोजित होती, असा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!