🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (ता. १२) शिवसेनेचा वचननामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. यात दहा रुपयांत गोरगरीबांना अन्न पुरविणे, शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी दहा हजार रुपये जमा करणे, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे अशा विविध आश्वासनाचा पाऊस पाडण्यात आला आहे.
महिला, युवा सक्षमीकरण, शेतकऱ्यांसाठी योजना, शिक्षण सुविधा, गरम विकास, शहर विकास, वीज निर्मिती व दर कपात, आरोग्य सुविधा, सन्मान निराधारांना, स्वच्छता व पर्यावरण उद्योग व रोजगार गृहनिर्माण, पर्यटन, कला आणि संकृती, सामाजिक न्याय आदि विषयांवर जा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे.
शिवसेनेच्या या वचननाम्यावर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. हा वचननामा नसून हा बनावटनामा असल्याची टीका काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टिवार यांनी केली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा आता कोरा करणार, तर मग पाच वर्षे झोपा काढल्या का? असा सवाल ही त्यांनी शिवसेनेला केला आहे.
दरम्यान, शिवसेनेने आपल्या वचननाम्यामध्ये १० रुपयात जेवणाची थाळी मिळेल, अशी घोषणा केलेली आहे. या घोषणेचा समाचार देखील पवार यांनी घेतला. “दहा रुपयांत जेवण राज्यात कुठे आणि किती ठिकाणी देणार? तुम्हाला राज्य करायला सांगतोय की स्वयंपाक करायला सांगतोय हाच प्रश्न पडलाय? अन्नधान्याचा प्रश्न आहे पण त्यासोबतच इतर प्रश्न देखील राज्यात आहेत.” अशी टीका पवारांनी केली.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182952221744361472?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182930667455172608?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

