चंद्रपूर : करोनाला चंद्रपूर जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यात शिरकाव करू दिलेला नाही. अशात एएनआय या वृत्त संस्थेनं चंद्रपूर जिल्ह्यात करोनाचा रुग्ण सापडल्याचं वृत्त दिलं होतं. हे वृत्त चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी फेटाळून लावलं आहे.
याबाबत चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे याविषयी माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘चंद्रपूरमध्ये करोनाचा बाधित रुग्ण असल्याचं काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आलं आहे. मात्र, आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातून जितके नमुने पाठवण्यात आले, त्या सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत, असं ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, ‘आज या घडीपर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यात नाही. चंद्रपूर जिल्हा हा पूर्णतः करोनामुक्त आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्यापर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही,’ असे चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, प्रशासनानं दिलेल्या सूचनाचं पालनं तंतोतंत करावं. आपल्या जिल्ह्यात करोनाला प्रवेश करू देणार नाही, हा विश्वास तुमच्या मनात ठेवा, असं आवाहन वडेट्टीवार यांनी नागरिकांना केलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

