🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना सोडल्यापासून नारायण राणे आणि शिवसेना यांचा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पहिला आहे. अनेक वेळा राणे आणि शिवसेना यांच्या लढाईने पातळी देखील सोडली. मात्र आता राणेंचा भाजप प्रवेश झाल्यानंतर हा संघर्ष काहीसा कमी झालेला दिसत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमला हजेरी लावल्यानंतर आता नारायण राणे यांचे पुत्र आणि कणकवली मतदार संघातील भाजपचे उमेदवार नितेश राणे यांनी युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक लढण्यावर सकारात्मक भाष्य केलं आहे.
महाराष्ट्राच्या विकासात आणि जडण-घडणीत ते आमच्यासोबत बसून, आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असतील तर मी त्यांना शुभेच्छा देतो. विधानसभेच्या पायऱ्यांवर त्यांची भेट व्हावी, अशी माझी इच्छा आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायची माझी इच्छा आहे,” असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
तर, दुसरीकडे शिवसेनेने कणकवलीमध्ये नितेश राणे यांच्या विरोधात उमेदवार उतरवत राणेंविरोधात आपली भूमिका आक्रमक ठेवली आहे. विनायक राउत यांनी ‘नारायण राणे यांच्या नावाचं विसर्जन शिवसेनेने या अगोदरच केलेलं आहे त्यामुळे राणेंच्या नावाची दखल घेणे आम्हाला गरजेचं नाही’ तसेच राजकारणातील विटाळलेलं नाव घेऊन स्वतः अपशकुन आणण्याची शिवसेनेची मुळीच इच्छा नाही अशा शब्दात राणेंवर टीका केली आहे.
यावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्याविरोधात काय भूमिका घ्यायची हा शिवसेनेचा प्रश्न आहे. पण मी माझ्या बाजूने शिवसेनेवर टीका करणार नाही, त्यांचा विरोध करणार नाही. मी फक्त विकासाचा मुद्दा घेऊन लोकांचा विश्वास कमावण्यासाठी रिंगणात उतरलो आहे. इतरांवर टीका करून मी माझ्या मतदारांचा वेळ वाया घालवणार नाही.” असं नितेश राणे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183329321072545792?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183325843315032065?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

