औरंगाबाद : महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असताना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव एमआयएमच्या नगरसेवकानी ठेवला. त्यावरून गोंधळ निर्माण झाला आणि, एमआयएमच्या नगरसेवकांनी राजदंड पळवला
नवनिर्वाचित खा.इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरून हा गोंधळ निर्माण झाला. या गोंधळादरम्यान, एमआयएम नगरसेवकाकडून राजदंड पळवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे वृत्त आहे. यात एमआयएमच्या 5 नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या नगरसेवकांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकित औरंगाबादेतून चंद्रकांत खैरे यांना पराभूत करुन इम्तियाज जलील यांनी विजय मिळवला. यानंतर इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्यात कायम शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले आहे. दरम्यान आता एमआयएमच्या नगरसेवकांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

