🕒 1 min read
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अमोल मिटकरी हे आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मिटकरी यांनी टिपु सुलतान यांच्याबद्दल केलेलं ट्वीट आज चांगलेच चर्चेत आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी टिपूचा उल्लेख थेट ‘मिसाईल मॅन’असा करत स्मृतिदिनी अभिवादन केले आहे.
आपल्या ट्वीटमध्ये मिटकरी म्हणतात, ‘इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे देशाचे ‘मिसाईल मॅन’ शहीद टिपु सुलतान यांचा आज बलिदान दिवस ! इंग्रजांना शेवटच्या श्वासापर्यंत टक्कर देऊन शरण न जाता लढणाऱ्या या स्वातंत्र्यविरास स्मृतिदिनी विनम्र अभिवादन ll’
इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे देशाचे मिसाईल मॅन "शहीद टिपु सुलतान" यांचा आज बलिदान दिवस ! इंग्रजांना शेवटच्या श्वासापर्यंत टक्कर देऊन शरण न जाता लढणाऱ्या या स्वातंत्र्यविरास स्मृतिदिनी विनम्र अभिवादन ll pic.twitter.com/FNrNVp72oR
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 4, 2020
खरं तर भारताचे दिवंगत महान राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा उल्लेख ‘मिसाईल मॅन’असा केला जातो मात्र आता मिटकरी यांनी असा उल्लेख केल्याने ट्वीटरवर त्यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे. अनेक मंडळींनी मिटकरी यांची मनसोक्त खिल्ली उडवली असून राष्ट्रवादीवर देखील चांगलीच टीका केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने वोट मागणारे सत्तेत आल्यानंतर टिपू सारख्या क्रूर आणि हिंदू नरसंहारकाच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतात हेच का ते हिंदवी स्वराज्य ???
— वैद्य वेदश्री ( मोदी का परिवार) (@Vedashreeeee_19) May 4, 2020
अरेरेरे काय दशा झाली हो आपली. ज्ञानाचे दिवे छान पाजळलेत किंवा आज पासून दारू विक्री सुरू झाली त्या मुळे घेतलीत क काय
— Rashtrarpan (@rashtrarpan) May 4, 2020
देशाचे मिसाईल मॅन आणि ते पण "शहीद टिपु सुलतान" ?
हे कधी झाले?
मग , डॉ. एपीजे अब्दुल कलाम कोण होते ? फक्त राष्ट्रपती?
अज्ञान खूप वाईट असते. आणि शिक्षण घेऊन ज्ञान येत नाही ह्याचे तू मूर्तिमंत उदाहरण आहेस.— समीर कुलकर्णी (@paramvaibhav) May 4, 2020
https://twitter.com/malhar4you/status/1257245872162832385?s=20
माझं एक सांगणं आहे मिटकरी साहेब तुम्हाला #हरी_नारायण_आपटे ह्यांचं म्हैसूरचा राजा हे पुस्तक जर आपण वाचलं नसेल तर जरूर वाचावं ज्याप्रकारे तुम्ही टिपू सुलतान चा उदो उदो करत आहात म्हणून. त्यांनी केलेले अत्याचार , जुलूम तुम्हाला कळतील
— pankaj chandrakala vasant patil (@moonart12) May 4, 2020
https://twitter.com/Rakesh74336131/status/1257266589818380291?s=20
शिवसेनेची अश्या मित्रा मुळे कुचंबणा होत असणार , पण काकांना दुखावले तर सत्ता जाईल ही भीती . शिवप्रेमी मराठी माणूस लक्षात ठेवणार ह्या गोष्टी
— prashant (@bhave2009) May 4, 2020
आणि जे १०००० मदिरे पाडलीत असंख्य हिंदूची कत्तल केली
असंख्य हिंदूंना तलवारीच्या जोरावर धर्म बदलावायला लावला
असंख्य आया बहिणींची अब्रू लुटली त्याचे काय
?
आणि आमच्या पूर्वजांनी २५०० – ३००० वर्षापूर्वीच वेदांमध्ये रॉकेट आणि विमान कसे उडवायचे ते लिहून ठेवले आहे— shripad mohole (@MoholeShripad) May 4, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

