Share

नाशिकमध्ये मुथूट फायनान्सवर फिल्मीस्टाईलं दरोडा, गोळीबारात ऑडिटरचा मृत्यू

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: नाशिक शहरामध्ये भरदिवसा फिल्मीस्टाईलं दरोडा टाकल्याची धक्कदायक घटना घडली आहे, शहरातील उंटवाडी परिसरातील मुथूट फायनान्समध्ये दरोडेखोरांनी गोळीबार करत लुट केली आहे. चोरट्यांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे.

सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास तोंडावर काळा कपडा बांधून पाच दरोडखोर मुथूटच्या कार्यालयात आले होते. यावेळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी दरोडेखोरांचा प्रतिकार करत धोक्याचा अलार्म वाजवला, त्यामुळे चिडलेल्या दरोडेखोरांनी बेछूट गोळीबार केला. यामध्ये संजू सॅम्युअल नावाच्या ऑडिटरचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोघे जखमी झाले आहेत.

घटनेनंतर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील स्वत: घटनास्थळी दाखल झाले, मात्र नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुन्हेगारांमध्ये पोलिसांची दहशत कमी होत चाललीय का असा प्रश्न या निर्माण झाला आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!