मुंबई:- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते दुपारी दोन वाजता सिंधुदुर्ग येथे खासदार नारायण राणेंच्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी प्रदेशाध्यक्ष चद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत.
भाजप नेते नारायण राणे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं आज सिंधुदुर्गात उद्घाटन होणार आहे. अमित शहा यांच्या हस्ते या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन होणार असून शहा सिंधुदुर्गात येऊन काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे.
आज दुपारी 2 वाजता अमित शहा यांच्या हस्ते नारायण राणे यांच्या लाईफटाइम मेडिकल कॉलेजचा उद्घाटन सोहळा पार पडेल. आज दुपारी बरोबर 1.50 वाजता शहा हे गोवा येथे पोहोचतील. तिथून हेलिकॉप्टरने ते पडवे-कसाल येथील लाईफ टाईम मेडिकल कॉलेज परिसरात येतील. या सोहळ्या निमित्ताने शहा तब्बल दोन तास सिंधुदुर्गात थांबणार आहेत. कार्यक्रमानंतर ते राणे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करतील.
महत्वाच्या बातम्या
- ‘अमित शहांच्या दौऱ्यानंतर राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असेल’
- आता एसबीआयचे रुपे जनधन कार्ड घ्या आणि मिळावा 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ
- टीम इंडियाला दुसरा धक्का, रोहित पाठोपाठ शुबमन गिल आऊट
- पोलीस दलातील ‘डॉन’ कालवश; दशकभर केली सेवा
- ‘सरकारी सवलतीला सोकावलेल्या सेलिब्रेटीनो जरा भान ठेवा, तुमचे बहुसंख्य फॉलोअर्स शेतकऱ्यांच्याच बाजूने’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

