🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: बार्शी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार दिलीप सोपल यांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. स्वतः सोपल यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटूंब प्रचाराच्या मैदानात उतरले आहे यामध्ये त्यांच्या सून उज्वला सोपल यांनी महिला कार्यकर्त्यांच्या सोबतीने ‘होम टू होम’ प्रचारावर भर दिल्याचं दिसत आहे.
माजी मंत्री असणारे दिलीप सोपल शिवसेनेकडून विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. प्रचारासाठी अवघे दहा दिवस उरल्याने सोपल यांच्यासह सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. यामध्ये नातू आर्यन सोपल यांनी युवकांच्या संघटनावर भर दिला आहे. आर्यन हे युवकांसाठी दिलीप सोपल यांनी केलेली कामे आणि भविष्यातील योजना समजावून सांगत आहेत. त्यांच्या जाहीर सभांना देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दुसरीकडे उज्वला सोपल यांनी बार्शी शहरात घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला आहे. बार्शी शहरात सोपल यांनी केलेली विकासकामे, नगरपालिकेत सत्ता असणाऱ्या विरोधकांनी शहरात निर्माण केलेली विदारक परिस्थिती मतदारांसमोर मांडली जात आहे. शहरातील महिला वर्गाकडून उज्वला सोपल यांना उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182960024483577856?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182958730939224065?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

