टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नीरा देवघर धरणाच्या पाणी प्रश्नावरून राष्ट्रवादीचेचं नेते रामराजे निंबाळकर आणि शरद पवार यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. तर माढ्याचे खा. रणजितसिंह निंबाळकर यांची पाठ थोपटली आहे. भाजप खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी आज सातारा शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी खासदार रणजीतसिंहांचं कौतुक केलं.
रणजितसिंह निंबाळकर यांनी खासदार होताच माढा,सोलापूर, पंढरपूरच्या पाणी प्रश्न ताबडतोब निकालात काढला. बारामतीला बेकायदेशीर रित्या होणारा पाणीपुरवठा खंडित करून ते पाणी माढा – सोलापूर कडे वळवण्यात आले. त्यामुळे खासदार झाल्यानंतर मतदारसंघातील लोकांसाठी घेतलेल्या पाण्याच्या धाडसी निर्णयाबद्दल राजेंनी रणजित निंबाळकरांचे कौतुक केले.
दरम्यान नीरा देवधर पाणी प्रश्नावरून सातारचे खा. उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांची चांगलीचं कान उघडणी केली. यावर उदयनराजे म्हणाले की, जमिनी लाटण्यासाठी काहींनी लोकांना पाण्यापासून दूर ठेवलं, स्वतःच्या स्वार्थासाठी १४ वर्ष पाणी बारामतीला पळवलं अशी घणाघाती टीका उदयनराजे यांनी केली.
नेमकं काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २००९ला करार बदलत बारामतीला ६० टक्के पाणी दिलं होतं. २०१७ मध्ये हा करार संपुष्टात आला होता. मात्र करार संपल्यानंतरही हे पाणी सुरूच होतं. अखेर नाईक निंबाळकरांनी पाठपुरावा करून हे पाणी बंद करण्यात यश मिळवलंय. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशाने बारामतीला जाणारे निरा डाव्या कालव्याचं नियमबाह्य पाणी बंद करण्यात येणार आहे. महाजनांनी याबाबत आदेश दिले असून दोन दिवसांत लेखी आदेश निघणार आहे.
जलसंपदा मंत्री महाजन यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करुन डाव्या कालव्यातून बारामतीला नियमबाह्य जाणारे पाणी कायमचे बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. याबाबतचा आदेश येत्या दोन दिवसात काढावा असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. हा अध्यादेश निघाल्यास सातारा जिल्ह्यातील वीर, भाटघर, नीरा-देवघर या धरणातून बारामती व इंदापूर तालुक्याला जाणारे पाणी कायम स्वरुपी बंद होवून त्याचा फायदा फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर या तालुक्यांना १०० टक्के होणार आहे.दरम्यान, रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी खेळलेल्या चाणाक्ष खेळीने पवारांना मात्र चांगलाच धक्का बसलाय.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

