टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नीरा देवघर धरणाच्या पाणी प्रश्नावरून राष्ट्रवादीचेचं नेते रामराजे निंबाळकर आणि शरद पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. जमिनी लाटण्यासाठी काहींनी लोकांना पाण्यापासून दूर ठेवलं, स्वतःच्या स्वार्थासाठी १४ वर्ष पाणी बारामतीला पळवलं अशी घणाघाती टीका उदयनराजे यांनी केली.
नीरा डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे बेकायदेशीरपणे पाणी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.नीरा डाव्या कालव्यातून बारामतीला बेकायदेशीर रित्या होणारा पाणीपुरवठा बंद व्हावा यासाठी खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी जलसंपदा मंत्री गिरीश बापट यांच्याकडे शिफारस केली होती.
या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहिजे. असे उदयनराजेंनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, स्वतःच्या स्वार्थासाठी १४ वर्ष पाणी बारामतीला पळवलं. जमिनी लाटण्यासाठी काहींनी लोकांना पाण्यापासून दूर ठेवलं असेही त्यांनी म्हंटले.
याचबरोबर, नीरा डाव्या कालव्याचा अध्यादेश काढण्यासाठी उशीरचं झाला. हा अध्यादेश आघाडीच्या कार्यकाळात अगोदरच काढायला हवा होता असेही त्यांनी म्हंटले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

