Share

सरकारची कर्जमाफी मला पटलेली नाही. – उद्धव ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : भ्रष्टाचार करणारी उमेदवारांना उमेदवारी देऊन प्रचारातही भ्रष्टाचार करणाऱ्या आणि तुरुंगातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना आवर घाला . आपले चांगले सबंध खराब करू नका, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रासपच्या महादेव जानकर यांना फटकारले. परभणीच्या पालममध्ये गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ पालम शहरात आयोजित सभेत बोलत होते.

गंगाखेड विधानसभा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला आलेला असताना रासप उमेदवार रत्नाकर गुट्टे यांनी बंडखोरी केली. त्यांच्या बंडखोरीवर आणि गुत्ते यांना उमेदवारी देणाऱ्या महादेव जानकरांवर ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, ”आम्ही यावेळी युती केली नसती तर सरकार अस्थिर राहिले असते म्हणून युती करावी लागली. सरकारची कर्जमाफी मला पटलेली नाही. आता सरकार येऊ द्या मला शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचे आहे. ”

तसेच विमा कंपनीचे दलाल पैसे घ्यायला येतात, मात्र गरजेच्या वेळी पैसे देत नाहीत. त्यामुळे पिक विम्याचा प्रश्न गंभीर झाला होता. पण त्यांना शिवसेनेने ११०० कोटी रुपये शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी द्यायला भाग पाडले. काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्तेत असताना किती खायला हवे याचाही विचार करायला हवा होता. थोडी लाज बाळगायला हवी, अशा शब्दात त्यांनी यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीवर ताशेरे ओढले. तर आमच्यासमोर लढण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी शिल्लकच राहिली नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1183343228751249408?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1183343438692900864?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!