Share

भगव्याशी गद्दारी केलेल्या हर्षवर्धन जाधवांना निवडणुकीत गाडणारचं : उद्धव ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कन्नडचे माजी आ. हर्षवर्धन जाधव यांच्यावर टीका केली आहे. ज्याने भगव्याशी गद्दारी केली अशाला आम्ही सोडत नाही, असे म्हणत ठाकरेंनी हर्षवर्धन जाधव यांना इशारा दिला. आज कन्नड-सोयगांव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार उदयसिंग राजपूत यांच्या प्रचारासाठी उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी जाधवांचा चांगलाचं समाचार घेतला.

ठाकरे म्हणाले की, हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी मारहाण केली तेव्हा आम्ही त्यांना मदत केली, तळ हाताच्याफोडाप्रमाणे जपले. पण नंतर मात्र हा फोड ठसठसला आणि फुटला, ते ही आम्ही सहन केले, मात्र लोकसभा निवडणुकीत भगव्याशी केलेली गद्दारी आम्ही कदापी सहन करणार नाही, त्यांना गाडणारचं, असे ठाकरे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी माजी खा. चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे मत विभाजन मोठ्या प्रमाणात झाले. याचा फटका खैरे यांना बसला आणि याचा फायदा मात्र सध्याचे खा. इम्तियाज जलील यांना झाला. त्यामुळे शिवसेनेला औरंगाबादची जागा गमवावी लागली. हाच धागा पकडत ठाकरे यांनी आज जाधव यांचा समाचार घेतला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!