🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा:-राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचाराने आता जोर धरला आहे. दिवसभरात अनेक ठिकाणी प्रचारसभांचं आयोजन केलं जात आहे.याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारार्थ शनिवारी सभा पार पडली.
यावेळी ठाकरे बोलताना म्हणाले, येवल्याच्या विकासासाठी ‘वचननामा’ करावा लागला. मग सत्तेसाठी आमदार काय करत होते? त्यामुळे आता वेळ आलेली आहे. इथला पाहुणा निवडून देऊ नका. हे पार्सल पाठवून द्या. कुठेही पाठवा पण मुंबईत पाठवू नका, असं म्हणत ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर तोफ डागली आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेत्यांकडून सभांचे आयोजन केले जात आहे. तसेच आपण केलेल्या कामाची पोचपावती पोहचविण्यासाठी नेते मंडली चांगलेच सक्रीय झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरवात झाली आहे. प्रत्येक पक्षाने उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183361571600228352?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183364367045148673?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

