Share

शेतकरी आंदोलनतील वाक् युद्धादरम्यान ट्विटरच्या पब्लिक पॉलिसी डायरेक्टरचा राजीनामा

Published On: 

नवी दिल्ली: नुकतच भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अंतर्गत विषयांवर वक्तव्य करत रीहाना आणि ग्रेटा यांना फटकारले होते. मात्र ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी रीहानाच्या या ट्विट ला लाईक केले आहे आणि यामुळे देखील एक वाद निर्माण झाला आहे. जॅक डॉर्सी यांनी अप्रत्यक्ष रीहनाला पाठींबा दिल्याचे चित्र असल्याने ट्वीटरवर आधीपासूनच नाराज असलेले केंद्र सरकार जॅक डॉर्सी यांच्या या कृतीकडे जखमेवर मीठ चोळल्याप्रमाणे पाहत आहे.

दरम्यान, ट्विटर इंडियाच्या पब्लिक पोलिसी डायरेक्टर महिमा कौल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वेळोवेळी  वादात राहिलेल्या कौल यांनी दिलेला हा राजीनामा शेतकरी आंदोलनासंबंधी  ट्विटरवर सुरू असलेल्या वाक् युद्धाच्या पार्श्वभूमीवर दिल्याचे वाटत आहे. मात्र, त्यांनी हा राजीनामा त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे दिला आहे. २०१५ मध्ये त्यांनी ट्विटर जॉईन केलं होत. जानेवारीच्या सुरुवातीला त्यांनी हा राजीनामा दिला आहे. तर हा काही काळासाठी ब्रेक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोदी सरकार आणि भारताच्या विरोधातील मुद्द्यांना प्रोत्साहन देण्याचा आरोप वारंवार ट्वीटरवर होत असतो मात्र आता कृषी आंदोलनाच्या निमित्ताने सर्वात मोठा प्रश्न हा विचारला जाऊ लागला आहे कि भारतात ट्विटरवर सरकार बंदी घालेल का ? तर या प्रश्नाचे उत्तर बऱ्याच जाणकार लोकांनी नाही असंच दिले आहे. सध्या सरकार ट्विटरवर बंदी घालून जनक्षोभाला भडकवणार नाही असं दिसतंय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!