पुणे : पुण्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच ‘ससून’चे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची सहसंचालकपदी नियुक्ती करण्याचे आदेश राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने तडकाफडकी काढले. डॉ. चंदनवाले यांना दोन दिवसांत मुंबईच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचा कारभार सांभाळावा लागणार आहे.
दरम्यान, डॉ. चंदनवाले यांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सह संचालक पदाचा पदभार तात्काळ सांभाळावा, असा आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सह सचिव शिवाजी पाटणकर यांनी दिला आहे.
दरम्यान, पुण्यात एकीकडे दिवसेंदिवस करोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. शिवाय मृत्यूंची संख्या देखील रोज वाढताना दिसत आहे. अशावेळी आज ससून रूग्णालयात 31 मार्च रोजी करोनाची बाधा झाल्याने एक 42 वर्षीय रुग्ण दाखल झाला होता . मात्र 14 दिवसांनंतरच्या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्याने, आज त्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

