Share

मोदींच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची बैठक, मात्र ममता बॅनर्जी राहणार अनुपस्थित

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान पदी दुसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदींच्या उपस्थित आज नीति आयोगाची पहिली बैठक होणार आहे. या नीति आयोगाच्या बैठकीला अनेक राज्यातील मुख्यमंत्री आणि उपराज्यपाल उपस्थित असणार आहेत. मात्र भाजपच्या कडव्या विरोधक पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनेर्जी या अनुपस्थित असणार आहे.

ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपल्या गैरहजेरी बाबत कळवले आहे. या पत्रात त्या म्हणाल्या की, ‘नीति आयोगाकडे कोणतीही आर्थिक ताकद नाही. तसेच, राज्यांनी तयार केलेल्या योजनांचे समर्थन करण्याची क्षमताही नाही. त्यामुळे माझ्यासाठी या बैठकीला हजेरी लावणे व्यर्थ आहे. त्यामुळे मी अनुपस्थित असणार आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या नीति आयोगाच्या बैठकीचा अजेंडा ठरला आहे. यामध्ये जल संधारण, कृषी आणि सुरक्षेतेच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. ही बैठक राष्ट्रपती भवनात होणार आहे. तसेच, या बैठकीला वित्त, गृह, संरक्षण, कृषी, वाणिज्य आणि ग्रामीण विकास मंत्रालयाचे मंत्री उपस्थित राहणार आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!