Share

राजस्थानात बेरोजगारीचा मुद्दा पेटला; विधानसभेबाहेर बेरोजगारांनी ठोकला तळ

Published On: 

जयपूर- राजस्थानमध्ये बेरोजगारांनी गहलोत सरकारविरोधात हल्लाबोल केला आहे. नोकरीच्या मागणीसाठी हजारो बेरोजगार महिला पुरुष राजस्थान बेरोजगार युनियनच्या बॅनरखाली विधानसभेबाहेर तब्बल 50 तासांपेक्षा अधिक काळ तळ ठोकून आहेत. मार्ग मोकळा करण्यासाठी पोलिस आणि बेरोजगारांमध्ये वारंवार संघर्ष होत आहेत. पण हे लोक इथून मागे हटण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.

बेरोजगार महिला पुरुषांच्या या समूहाला राजस्थान विधानसभेत जायचे होते पण पोलिसांनी त्यांना विधानसभेबाहेर रोखले. हे लोक 2 दिवसांपासून रस्त्यावर बसून आहेत. कडाक्याच्या थंडीत त्यांनी रात्र रस्त्यावर बसून काढली आहे. पोलिस त्यांना जागा रिकामी करण्याची धमकी देत  असल्याची चर्चा आहे.

आंदोलनकर्त्यांचे हे म्हणणे आहे की राज्यात दोन डझनहून अधिक भरती परीक्षा प्रलंबित आहेत. बहुतांश  परीक्षांचे निकाल लावले जात नाहीत. सरकारच्या या कारभाराला कंटाळलेले हे लोक जयपूरमध्ये बसले आहेत.

आंदोलकांमध्ये मोठ्या संख्येने महिला देखील आहेत त्यांच्या हातांमध्ये मुलं देखील आहेत. यासोबतच काही मुली देखील आहेत, त्यांनी रात्र खुल्या आकाशाखाली घालविली आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी त्यांच्याशी बोलले पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे, परंतु सरकारचे कोणतेही प्रतिनिधी अद्याप त्यांच्याशी बोलण्यासाठी आले नाहीत.

नर्सिंग, जीएनएम आणि एएनएमच्या हजारो पदांवर भरती करावी अशी त्यांची मागणी आहे. पंचायती राज एलडीसी 2013 मधील 10029 पदांची प्रलंबित भरती लवकरात लवकर पूर्ण करावी. तृतीय श्रेणी शिक्षक भर्ती 2012 बाबत देखील सुरु असणारा वादाचा मुद्दा निकालात काढावा अशी मागणी आहे.आज तक या हिंदी वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!