🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विराट कोहली-अनुष्का शर्मा, युवराज सिंग-हेजल कीच, झहीर खान-सागरिका घाटगे, हरभजन सिंग-गीता बसरा, या क्रिकेटपटू-अभिनेत्रीच्या जोड्यांनी लग्न केलं. आता भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू मनीष पांडे एका दक्षिणात्य अभिनेत्रीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. मनिष पांडे हा दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टीसोबत येत्या २ डिसेंबरला लग्न करणार आहे. मनिष सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये कर्नाटकच्या टीमचं नेतृत्व करत आहे.
२६ वर्षांच्या अश्रिताने २०१२ साली रिलीज झालेल्या तेलीकेडा बोली या चित्रपटातून सिनेक्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिने इंद्रजीत, ओरु कन्नयम मुनू कलावानिकलम, उदयम एनएच ४ यासारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्या लग्नसोहळ्यासाठी मनिष त्याच्या लग्नाला जवळचे मित्र आणि नातेवाईकांनाच बोलावणार असून संपूर्ण रिती रिवाजानुसार हे लग्न २ दिवस चालणार आहे. २०१५ साली झिम्बाब्वेविरुद्ध मनिषने त्याची पहिली मॅच खेळली.
२०१६ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सीबी सीरिजच्या शेवटच्या मॅचमध्ये मनिष पांडेने ८१ बॉलमध्ये नाबाद १०४ रन करुन भारताला विजय मिळवून दिला होता.
मनिष पांडेचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं हे एकमेव शतक आहे. यानंतरही त्याला संधी मिळाली, पण त्याला म्हणावी अशी कामगिरी करता आली नाही. मनिष आयपीएलमध्ये शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. २००९ साली बंगळुरूकडून खेळताना हैदराबादविरुद्ध मनिष पांडेने नाबाद ११४ रनची खेळी केली होती. यानंतर मनिष पांडे पुणे आणि कोलकात्याकडूनही खेळला. २०१८ साली हैदराबादने मनिष पांडेला ११ कोटी रुपयांना विकत घेतलं, यामुळे मनिष पांडे हैदराबाद टीमचा सगळ्यात महागडा खेळाडू झाला.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1182930667455172608?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182952221744361472?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

