🕒 1 min read
मुंबई : जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेले राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली असून कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र घाबरला नाही घाबरणार नाही असे सांगतानाच जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल येथे व्यक्त केला.
सह्याद्री अतिथीगृह येथे महाविकास आघाडी शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा झाला त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, खासदार, आमदार यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले, जनतेच्या आशिर्वादामुळे तीन पक्षांचं सरकार वर्षभरापूर्वी अस्तित्वात आलं. वर्षभरात नैसर्गिक संकटांना तोंड देत राज्यातील जनतेच्या पाठीशी ठामपणे हे सरकार उभे आहे. नैसर्गीक आपत्तीत बळीराजाला सावरतानाच कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी भक्कमपणे काम केलं जात आहे. कोरोनाकाळात रुग्णसंख्या असो की मृत्यूसंख्या त्यात राज्य शासनाने लपवाछपवी केलेली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
संकटग्रस्ताला धीर देण्याचं काम- खा. शरद पवार
खासदार शरद पवार म्हणाले की, हे सरकार म्हणजे जगन्नाथाचा रथ असून त्याला पुढे नेण्याची कामगिरी सर्वांच्या साथीने होत आहे. वर्षभरात संकटग्रस्ताला धीर देण्याचं काम या शासनाने केलं आहे. त्यामुळे संकटकाळात बळीराजा कधी रस्त्यावर आला नाही असं काम या शासनाने केल्याचा उल्लेख पवार यांनी यावेळी केला. नविन उमेद आणि प्रदीर्घ अनुभव या समन्वयातून या शासनाची वाटचाल सुरू असल्याचे सांगतानाच लोकांचा सहभाग यात दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.
समर्थ महाराष्ट्राला घडविणाचा निर्धार- उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जनतेच्या विकासासाठी हे सरकार बांधील आहे. विविध विभागांच्या निर्णयांचा समावेश असलेली ही पुस्तिका प्रकाशीत केल्याबद्दल त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे कौतुक केले. या शासनाची वर्षपूर्ती ही समर्थ महाराष्ट्राला घडविणाऱ्या निर्धाराची असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जनता आणि प्रशासन यांच्यात संघ भावना निर्माण करण्याचे काम केल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोना योद्धयांचे आभार मानत कोरोना काळात विकास कामांना खीळ बसणार नाही याची ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
महाराष्ट्र घाबरला नाही.. घाबरणार नाही, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – उद्धव ठाकरे
धुळे-नंदुरबारच्या निकालावरुन महाविकास आघाडीचे भविष्य काय असेल हे स्पष्ट झाले : प्रवीण दरेकर
पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची पण गरज नाही पडणार – खडसे
‘शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आल्यावर काय होतं, ते या निकालाने दाखवून दिलं’
- ‘हे मुख्यमंत्र्यांचे कौतुक की अब्रू काढणे फक्त पवारच सांगू शकतात’, भाजपचा ठाकरे सरकारला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

