औरंगाबाद : जिल्ह्यातील पैठण तालुक्यात पाचोड येथील कौंदर येथे रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी तीन घरे फोडून लाखो रूपयाचा ऐवज लंपास केला. रविवारी पहाटे ही घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. विषेश म्हणजे चोरट्यांनी चोरी केलेल्या सर्व ठिकाणी शेजारील घराच्या बाहेरून कड्या लावल्या होत्या.
चोरट्यांनी कौंदर येथील रावसाहेब ठाणगे यांच्या घराशेजारील सर्व घरांना बाहेरून कड्या लावल्या. नतंर रावसाहेब ठाणगे यांच्या घरातील एक लाख पंधरा हजार रोख रक्कम तसेच ८ ग्रॅम सोने,२ ग्रॅम चांदी अशा ऐवज लंपास केला. तसेच या परिसरातील अनिल राऊत यांच्या घरातील २० हजार रूपये रोख तसेच सामान लंपास केले. त्यानंतर चोरट्यांनी भागवत खिरे यांच्या घराकडे आपला मोर्चा नेला त्यांच्या घरातील अकरा हजार रूपये चोरट्यांनी लंपास केले.
या घटनेविषयी पोलीस पाटील रामेश्वर सोनवणे यांनी पाचोड पोलिस स्टेशनला माहिती दिली. पाचोड पोलीस स्टेशनचे जमादार किशोर शिंदे, पोलिस काॅन्सटेबल फिरोज बरडे यांनी घटनास्थळी दाखल घटनेचा पंचनामा केला.पाचोड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली,व पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार किशोर शिंदे,फिरोज बरडे करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ठरलं तर…! नाना पटोले ‘या’ तारखेला स्वीकारणार काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र
- ‘बाळासाहेब ठाकरेंचे सर्व सिद्धांत तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेत’
- ‘मी बंद खोलीत कधीच काही करत नाही, उद्धव ठाकरे खोटं बोलले’
- ‘अमित शहांना उद्घाटनासाठी कोकणात आणणारे राणे हे हुशार राजकारणी’
- अमित शाह यांना डेअरिॅगबाज संबोधत राणेंची शिवसेनेवर बोचरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

