🕒 1 min read
पुणे:- राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निकालातून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचे फळ मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. कारण, भाजपला औरंगाबादसह हक्काचा मानला जाणारा पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवून भाजप आणि मुख्यत्वे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना हादरा दिला आहे. चंद्रकांत दादांनीच माझा विजय सोपा केला, असा टोलाही अरुण लाड यांनी विजयानंतर लगावला आहे.
कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड, भाजपचे संग्रामसिंह देशमुख आणि अपक्ष उमेदवार श्रीमंत कोकाटे यांच्यात तिरंगी लढत होईल असे म्हटले जात होते. श्रीमंत कोकाटे यांनी मोठ्या प्रमाणावर मते घेतली तर त्याचा तोटा हा राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांना होईल असे म्हटले जातं होते. पण दरम्यान, या निवडणुकीत अपक्ष उमेदवार श्रीमंत कोकाटे यांनी अवघे ६५७२ मते घेतली.
दरम्यान, पुणे आणि नागपूर पदवीधर हे भाजपचे हक्काचे मतदारसंघ मानले जात होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुण्याचं दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. तर नागपूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. तेव्हा पासून नागपूर पदवीधर हा भाजपकडेच होता. पण यंदा या दोन्ही मतदारसंघात भाजपला जबरदस्त हादरा बसल्याचं पाहायला मिळतं आहे.
महत्वाच्या बातम्या
आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारांचे मानले आभार
धुळे-नंदुरबारच्या निकालावरुन महाविकास आघाडीचे भविष्य काय असेल हे स्पष्ट झाले : प्रवीण दरेकर
पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची पण गरज नाही पडणार – खडसे
‘हा विजय आघाडीतील सर्व पक्षांच्या एकजूटीचा व राज्यातील जनतेच्या सरकारवरील विश्वासाचं प्रतिक’
- ‘शेतकरी,कष्टकरी,कामगार व मध्यमवर्गीयांसह उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत’


