🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. या प्रचारात प्रणिती शिंदे यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी मला सत्ता वा पदाची लालसा नाही. जर असती तर कधीच मी काँग्रेस पक्ष सोडला असता. केवळ जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने मी राजकारणात आहे असं विधान केले आहे.
पुढे बोलताना त्यांनी माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी स्वत: आत्मपरीक्षण करावे. केंद्र, राज्य व महापालिकेत सत्ता असूनही शहरातील विकासकामे झाली नाहीत. तर दुसरीकडे सत्तेसाठी इकडून तिकडे उड्या मारणाºयांची टोळीच तयार झाली आहे. अशा मंडळींनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना साथ दिली नाही तर ते तुम्हाला तरी साथ कशी देतील असं विधान केले आहे.
पुढे बोलताना त्यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दूरदृष्टी ठेवून शहरासाठी अनेक विकासाची कामे केली. उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीची योजना त्यांनीच आणली. आहेरवाडी येथे एनटीपीसीचा प्रकल्प आणल्यावर त्यांनी शहराला जलवाहिनी देण्याची अट घातली. यामुळेच दुसरी जलवाहिनी मिळत आहे असंही शिंदे म्हणाल्या आहेत.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी राज्यात सरकार कुणाचेही आले तरी मी इथल्या जनतेसाठी काम करणार असं विधान त्यांनी केले आहे. प्रणिती शिंदे या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. त्या २०१४ ला सोलापूर मध्य या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182915526068076544?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182915000496611329?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182914670832676866?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

