लातूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून लातूर शहरात भारतीय चलनाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांची भव्य दिव्य कलाकृती साकारण्यात येणार आहे. या कलाकृतीसाठी लातूर येथील जनता दरबार प्रतिष्ठान यांनी पुढाकार घेतला असून धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील विश्वविक्रमी कलाकार राजकुमार कुंभार यांच्या संकल्पनेतून ही कलाकृती साकारली जाणार आहे. ही कलाकृती जगातील पहिली चलनाच्या माध्यमातून साकारली जाणारी कलाकृती ठरणार आहे. याची जागतिक विश्वविक्रमी नोंद करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली असून ही कलाकृती चलनातून साकारली जाणारी जगातील एकमेव कलाकृती ठरणार आहे.
या कलाकृतीच्या पश्चात यात वापरल्या गेलेल्या चलनातून दिनांक 20 रोजी महा-अन्नदान केले जाणार आहे जयंतीनिमित्त वायफळ खर्चांना बाजुला सारत छत्रपती शिवाजी महाराज यांची विश्वविक्रमी कलाकृती तयार करून त्यात वापरलेल्या चलनातून जनतेत अन्नदानाचा अनोखा उपक्रम राबवण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव इथले कलाकार राजकुमार कुंभार यांची ही १३ वी विश्वविक्रमी कलाकृती ठरणार आहे. लातूर इथल्या दयानंद गेट परिसरात साकारल्या जाणाऱ्या या प्रतिमेचा आकार २५ फूट उंच तर २० फुट रुंद आहे. शिवजयंतीच्या आदल्या दिवशी म्हणून १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता ही प्रतिमा साकारण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- पूजा चव्हाण प्रकरण : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राज्याचे पोलीस महासंचालक ऍक्शन मोडमध्ये !
- जालनेकरांची खड्डेमय रस्त्यातून होणार सुटका; आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रयत्नांना यश
- ये नया हिंदुस्तान है…जाणून घ्या LAC वरुन चीनने अचानक माघार का घेतली?
- पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने विरोधकांच्या भूमिकेवर यु-टर्न सारखी शेरेबाजी करणे शोभते का ?
- काका, आपण ‘महाराष्ट्राचं नेतृत्व’ करावं ह्याच सदिच्छा ! तांबेंच्या शुभेच्छांनी चर्चांना उधाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

