Share

मनपाच्या नाकर्तेपणामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय्य सहाय्यकाची पत्नी पडली बारवात

Published On: 

औरंगाबाद : शहरातील महानगरपाीकेच्या दुर्लक्षामुळे जिल्हाधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटूंबीयाना शिक्षा भोगावी लागली आहे. शहरातील एक बारव अनेक तक्रारी, मागणी करुनही बुजवण्याकडे मनपाने दुर्लक्ष केले. याच बारवेत एका जिल्हाधिकारी कार्मचाऱ्यांची पत्नी व मुलगी गुरुवारी पडुन जखमी झाल्या. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रशासनाच्या कुटूंबीयांचा अपघात घडला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीस सहायक दीपक मोरे यांच्या पत्नी सोनाली दीपक मोरे व मुलगी नियती दीपक मोरे या गुरुवारी रात्री ९ वाजेच्या आसपास घृष्णेश्वर कॉलनी जाधववाडी येथे जात होत्या. रस्त्यात एका ठिकाणी प्लॉटधारकाने ३० फूट बारवेलगत चारी खोदुन रस्त्यावर भराव टाकला होता. या वळणावर जाताना चालक प्रफूल्ल बावने यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने, त्यांनी तोल सावरण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नात मागे बसलेल्या सोनाली व नियती ३० फुट खोल बारवेमध्ये पडल्या. बारवेतील दगड व महादेवाच्या पिंडीवर आदळल्याने सोनाली गंभीर जखमी झाल्या. तर नियती किरकोळ जखमी झाली. दोघींवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

परिसरातील नागरिकांनी दोघींना बारवेतून बाहेर काढले व खासगी रुग्णालयात दाखल केले. या परिसरातील माजी नगरसेवक सीताराम सुरे यांनी ही बारव बुजवावी अशी मागणी अनेक वर्षापासून करत आहे. पण मनपा प्रशासन याकडे लक्ष देत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. तर बारवेजवळील काही लोकांची जागा ही रस्ता रुंदीकरणात जाणार आहे. या वादामुळे हे काम रखडले आहे असे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी सांगितले. ही बारव धोकादायक आहे असे मनपा प्रशासनाला कळवले होते. मात्र यानंतरही मनपा प्रशासनाने या बारवेभोवती सुरक्षा भिंत बांधली नाही. यामुळे हा अपघात झाला, या अपघातास मनपा प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. आठवडाभरात मनपाने बारव न बुजवल्यास आम्ही स्वखर्चाने बुजवू, असा पवित्रा येथील नागरिकांनी घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!