🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका गीता कपूर सगळ्यांची गीता मॉं म्हणून ओळखली जाते. गीता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत गीता चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता तिने केलेल्या एका पोस्टमुळे गीता मॉं चर्चेत आली आहे. मात्र गीताने या फोटो बाबत खुलासा केला आहे.
गीता कपूरचे लग्न झाले नाही तर तिने सिंदूर का लावले होते? तिने गुपचुप लग्न केले का ? असे एक ना अनेक प्रश्न या फोटो वरुन चाहत्यांना पडले होते. मात्र गीताने आता चाहत्यांचे सर्व गोंधळ दूर केले आहेत आणि तिने सिंदूर का लावले होते हे स्पष्ट केले आहे.गीता कपूर म्हणाली, ‘नाही मी लग्न केलेले नाही … मी लग्न केले तर मी ते अजिबात लपवणार नाही, पण आत्ताच मी लग्न कसे करू शकते?’ मी नुकतीच माझी आई गमावली आहे, मी सध्या याबद्दल विचार करत नाही.’
https://www.instagram.com/p/COzeQ_Ghf6r/?utm_source=ig_web_copy_link
या बरोबरच तिने सिंदूर लावण्याचे कारणही सांगितले. ते म्हणाले, ‘ही चित्रे डान्स रिअॅलिटी शो सुपर डान्सर चॅप्टर ४ च्या आगामी भागातील आहेत. हे भाग बॉलिवूडची अभिनेत्री रेखाजी यांच्याबद्दल आहे. आम्ही त्यांच्यासारखे तयार होण्याचा पर्यटन करत आहोत. जगाला माहित आहे की मी रेखा जीची खूप मोठी फॅन आहे, मी तिच्यासारखेच कपडे घालायचे ठरवले. ती सिंदूर लावते म्हणून मी सुद्धा केले.’ असे तिने लग्ननाबाबतच्या चर्चाना पूर्णविराम दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पंतप्रधान मोदींना वाटतं मराठा आरक्षण हा राज्याचा विषय, त्यामुळेच ते संभाजीराजेंना भेटले नाहीत’
- अमृता सिंगसोबत साखरपुड्यानंतर मोडले होते रवी शास्त्री यांचे लग्न
- ‘राज्य सरकार आमच्यामुळे आहे, सरकारमुळे आम्ही नाही’, काँग्रेसचा सेना, राष्ट्रवादीला इशारा
- उत्तर प्रदेश हे आता ‘नाथांचे नसून अनाथांचे राज्य’
- मोदींच्या अश्रूंची खिल्ली उडवणार्यांवर बरसली कंगना, म्हणाली…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

