Share

‘ओबीसी समाजाचा आवाज दाबला जातोय’; समीर भुजबळांच्या अटकेवरून माळी समाज आक्रमक

Published On: 

नाशिक : ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी दोन दिवसांपूर्वी पुण्यात माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी बांधवाचा मोर्चा काढण्यात आला होता. मात्र मोर्चाला पोलिसांची परवानगी नसल्याने शनिवार वाड्यावर पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. परवानगी नसताना मोर्चाचे नेतृत्व करत असलेले माजी खासदार समीर भुजबळ मोर्चा काढण्यावर ठाम होते. मात्र पोलिसांनी समीर भुजबळ यांच्यासह आंदोलांना अटक केली होती.

आता, पुणे शहर पोलिसांनी ओबीसी मोर्चाला परवानगी नाकारत माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक करणे दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करत माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांनी टीकेची झोड उठवत प्रसिद्धी पत्रक काढून निषेध व्यक्त केला आहे. महात्मा फुले समता परिषद व ओबीसी संघटनांच्या वतीने राज्यांतील प्रत्येक तालुक्यात ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी तालुकास्तरावर कोविड नियमांचे पालन करून शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून ओबीसींच्या मागण्या शासनापर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न करत असतांना पुणे येथे ओबीसी मोर्चाला परवानगी नाकारून ओबीसी नेते माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक करणे करणे म्हणजे ओबीसींची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे कि काय असा प्रश्न आम्हांला पडला आहे.

तर, शासन ओबीसींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय निर्माण होत असून गृह विभागाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.ओबीसी आंदोलकांवर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल करू नये अशी मागणी करत.आरक्षणाच्या संदर्भात राज्यांमध्ये सरकार ओबीसी व मराठा समाजांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असे चित्र निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.

काय आहे हे प्रकरण?

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती, पुणे यांच्या वतीने शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा काढण्यात येणार होता. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा पूर्णपणे पाठींबा आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये. त्यामुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करणे यासह विविध शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे मोर्चा काढण्यात येणार होता.

मात्र, पोलिसांनी कोविडच्या पर्सवभूमीवर परवानगी नाकारली होती. तरीही हे आंदोलन केलं जात असल्याने पोलिसांनी मोर्च्यातील कार्यकर्त्यांसह आयोजक असलेल्या समीर भुजबळांना देखील काही काळासाठी अटक करण्यात आली होती. यानंतर, हे आंदोलन थांबण्यात आलं होतं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!