पुणे- शिवप्रेमींच्या दणक्यानंतर पुण्यात शनिवार, दि. २० फेब्रुवारी रोजी होणारा वशाटोत्सव हा अखेर रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीउत्सवावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र शिवजयंती उत्सवाच्या नेमक्या दुसऱ्याच दिवशी हजारोंच्या संख्येने होणाऱ्या या वशाटोत्सवासाठी परवानगी देण्यात आल्यानंतर याबाबत अनेक शिवप्रेमींनी आक्षेप नोंदवला होता.
‘महाराष्ट्र देशा’ने देखील यांसदर्भात जोरदार आवाज उठवला होता याचा देखील इंपॅक्ट दिसून आला.दरम्यान,यावरून मोठा गदारोळ माजताच अखेर आयोजकांनी शुक्रवारी रात्री उशीरा हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले.संभाजी ब्रिगेड तसेच भूमाता ब्रिगेडने देखील या कार्यक्रमाला विरोध दर्शविला होता.
कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता वशाटोत्सवाला राज्य सरकारचे मंत्री आणि शरद पवार हजर राहणार का, याबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारला विरोधकांना देखील हा कार्यक्रम झाला असता तर एक चागला टीका करण्यासाठी मुद्दा मिळाला असता म्हणून देखील हा कार्यक्रम रद्द झाला असल्याची चर्चा आहे.
यावेळी या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे या नेत्यांची प्रमुख उपस्थिती राहणार होते. मात्र, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून, तो पुढे ढकलण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- गारपिटीत शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान, हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई द्या : आ. संतोष दानवे
- कळमनुरीच्या ‘त्या’ कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’नेच
- दोन अल्पवयीन मुलींशी विवाह करणाऱ्या दोन नवरदेवांसह 11 जणांवर गुन्हा दाखल
- प्रेयसीला भेटायला जायचे म्हणून पठ्ठ्याने चोरली दुचाकी; सेलू येथील घटना
- भरधाव कारची दुचाकीला जोराची धडक; अपघातात दुचाकीवरील दोघे ठार


