Share

‘गद्दारी करणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करणार’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्षांतर करत भाजप आणि शिवसेनेची वाट धरली आहे. यामुळे राष्ट्रवादीची अवस्था कमकुवत झाली आहे. असं असले तरी पक्षातील जेष्ठ नेते पूर्ण ताकदीनिशी प्रचार करताना दिसून येत आहेत.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिरूर येथे बोलताना ‘ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केलेलं आहे, अशांचा निर्णय उद्या सकाळपर्यंत पक्ष कार्यालय घेईल आणि अशांना हाकलून देण्याचं काम केलं जाईल. पक्ष स्वच्छ करायचा आहे, असं विधान करत बंडखोरी करणाऱ्यांना इशारा दिला आहे.

पुढे बोलताना पाटील यांनी ‘शरद पवार साहेबांवर निष्ठा नसणारे, पक्ष विरोधी कारवाया करणारे आणि पक्ष सोडून गेलेल्या गद्दारांची गय करणार नाही. लोक मला विचारतात अनेक जण पक्ष सोडून जातात, कसं वाटतं? तर मी म्हणतो चांगलं वाटतं. यापूर्वी जी मंडळी पक्षात होती, त्यांच्यामुळे पक्ष अडचणीत आला होता, आज ते नाहीत ते एका अर्थाने बरं आहे असं पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, अनेक जेष्ठ नेत्यांनी साथ सोडल्यानंतर राष्ट्रवादी आणि शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्ष उभारिला भर दिला आहे. अनेक जेष्ठ नेते विविध मतदारसंघात जाऊन प्रचार करताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1183219825524428800?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1183216597806149632?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1183019244633485314?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!