औरंंगाबाद : नेहमीप्रमाणे सकाळी देवपूजेसाठी मंदिराज जात असलेल्या ७४ वर्षीय वृध्द महिलेचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून नेले. ही घटना शुक्रवारी (दि.१९) सकाळी अत्यंत गजबजलेल्या राजाबाजार-किराणाचावडी रस्त्यावर घडली. दरम्यान, दुचाकीस्वार मंगळसूत्र चोर सीसीटीव्ही वॅâमेNयात वैâद झाला असल्याची माहिती सिटीचौक पोलिस ठाण्याच्या सुत्रांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकुंतला जयचंद सेठी (वय ७४, रा.किराणा चावडी, राजाबाजार) या नित्यनेमाने रोज सकाळी राजाबाजार मधील मंदिरात देवपूजेसाठी जात असतात. शुक्रवारी देखील त्या सकाळी साडेआठी वाजेच्या सुमारास घरातून मंदिराकडे एकट्याच पायी जात होत्या. घराच्या काही अंतरावर जाताच तोंडाला मास्क बांधलेला एक दुचाकीस्वार त्यांच्या जवळून गेला व पुढे काही अंतरावर जाऊन त्याने दुचाकी वळवून आणली व सेठी यांना काही कळण्याच्या आतच त्यांच्या गळ्यातील सोन्याचे आठ तोळ्यांचे मंगळसूत्र ओरबडले व सुसाट वेगात दुचाकीस्वार चोरटा शाहगंजच्या दिशेने पसार झाला.
या घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलिस ठाण्याचे संभाजी पवार, व गुन्हेशाखेचे साह्ययक निरीक्षक अजबसिंग जारवाल, पोलिस अंमलदार झिने,राजेंद्र साळुंखे, पाटील यांच्या पथकाने घटनस्थळी गाठले व परीसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका दुकानावर लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये चोरटा कैद झाला आहे. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात मंगळसूत्र चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- परभणीमध्ये विनामास्क फिरणाऱ्या ५४ जणांना १० हजार ८०० रुपयांचा दंड
- छत्रपती शिवाजी महाराजांना राज ठाकरेंची खास शैलीत शिववंदना !
- वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा उघडत आहेत कोविड सेंटर्सचे दार
- एका माळेचे मणी : नेतेच कोरोनाचे नियम पाळत नसतील तर सर्वसामान्य लोकांनी तरी ते का पाळावेत?
- वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा उघडत आहेत कोविड सेंटर्सचे दार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

