Share

पुलवामा हल्ला करण्यासाठी पाकड्यांनी ‘अशी’ आखली होती योजना; गुप्तचर यंत्रणेच्या हाती आली माहिती

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. संपूर्ण जगभरात या हल्ल्यानंतर संतापाची लाट उसळली असून पाकड्यांचा निषेध केला जात आहे.

या हल्ल्याची सर्व जबाबदारी पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

परंतु या हल्ल्याच्या संघटनेमागचा खरा सूत्रधार पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तचर यंत्रणा असल्याचे धागेदोरे भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या हाती लागले आहेत.

या हल्याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, कश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलावर हल्ला करण्याची योजना जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरने वर्षभरापूर्वीच आखली होती. हा हल्ला करण्यासाठी गेल्या वर्षी रमजान सुरू होण्याच्या एक महिना आधी जैश-ए-मोहम्मदच्या १५० दहशतवाद्यांना तयार करण्यात आले असल्याची माहिती हाती आली आहे.

यासोबतच या १५० दहशतवाद्यांना जम्मू काश्मीरमध्ये स्थानिक पातळीवर मदत मिळण्यासाठी या भागातील सुमारे २० कश्मिरी तरुणांचे ब्रेनवॉश केले असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे.

याच माहितीच्या आधारावर जैश-ए-मोहम्मदचे डॉझियर गुप्तचर यंत्रणा तयार करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयला जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांवर सर्वाधिक विश्वास असल्याचे समजते आहे.

जम्मू काश्मीरच्या भागात आत्मघातकी हल्ले घड़वण्यासाठी जैशच्या दहशतवाद्यांचीच निवड करण्यात आली . त्यानंतर पाकव्याप्त कश्मीरमधील नयाली प्रशिक्षण केंद्रात 150 दहशतवाद्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले.

या दहशतवाद्यांचे ब्रेन वॉश करण्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदचा दुसरा कमांडर ‘अब्दुल रऊफ’ याच्यावर सोपवण्यात आली होती. त्यानंतर या दहशतवाद्यांना सीमेपलीकडे घुसवण्याची आयएसआयची योजना होती.

 

दरम्यान,पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. भारत केव्हाही सर्जिकल स्ट्राइक करू शकतो या भीतीने पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील दहशतवाद्यांचे तळ हलवण्यास सुरुवात केली आहे. आमच्या Let’s Talk या आमच्या विशेष कार्यक्रमात याच मुद्द्याबाबत आम्ही पुण्यातील तरुणाई बरोबर संवाद साधला. पाकिस्तानला त्याच्याच भाषेत धडा शिकविण्याची मागणी यावेळी संतप्त तरुणांनी केली आहे.
पहा व्हिडीओ – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!