मुंबई : भाजप नेते निलेश राणेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवारांचा फोलपणा उघड करणारा व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘दरोडेखोर लाजतील अश्या आमदारांसमोर. ह्या प्रकारच्या लोकप्रतिनिधींमुळे काम झालं नाही, तरी चालेल पण शायनिंग पूर्ण झाली पाहिजे, ही व्यवस्था आली आहे’, असं म्हणत निलेश राणे यांनी रोहित पवारांवर तोफ डागली आहे.
ट्वीटरद्वारे शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये कर्जतचे आमदार रोहित पवार यांच्या संपर्क कार्यालयातून एका व्यक्तीस फोन करून घरकुलाचे अनुदान आले ना ? असे विचारण्यात आले आहे.
पुढील अज्ञात व्यक्ती घरकुलाचे अनुदान आले आहे, असे म्हणताच संपर्क कार्यालयातून फोन करणाऱ्या व्यक्तीने उद्या बैठक ठेवली आहे. बैठकीस उपस्थित राहा. श्रीराम मंगल कार्यालय कर्जत या ठिकाणी दुपारी ३ वाजता बैठक आहे, अशी माहिती दिली आहे.
पुढे त्या अज्ञात व्यक्तीने रोहित दादांनी बैठक बोलावली आहे का? असा सवाल करत आम्हाला घरकुल कर्जत नगरपंचायतीकडून मिळाले आहे, त्यामुळे बैठकीला येऊ शकत नाही, असे ठणकावले आहे.
पवार यांच्या कार्यालयातून फोन करणाऱ्या व्यक्तीने रोहित पवारांनीच घरकुल आणले आहे, असा दावा केला आहे. याला त्या अज्ञात व्यक्तीनेही चोख प्रत्युत्तर देत रोहित पवारांमुळे घरकुल नाही, तर पंतप्रधानांच्या योजनेतून मंजूर झाल्याचे सांगत बैठकीला येऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कसोटीगिरी’ साठी नावाजलेल्या पुजाराचं तब्बल ७ वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन !
- प्रीती झिंटाच्या पंजाबने ‘शाहरुख खान’ला केलं आपल्या संघात शामिल !
- ‘सरकारच्या आशीर्वादाने पोलीस पूजा चव्हाण केस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत’
- शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी घालता मग…वशाटोत्सव आणि साहित्य सम्मेलनही रद्द करा – संभाजी ब्रिगेड
- ‘अमिताभ बच्चन यांचा मेमरी लॉस झाला आहे का?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

