मुंबई – राज्यात २०१९ मध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या ३ पक्षांचं मिळून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन विरोधी विचारसरणी असलेल्या पक्षांचं राज्यात सरकार आलं. मात्र, सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये वेळोवेळी मतभेद असल्याचं समोर आलं आहे.
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत असताना काही दिवसांपूर्वी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत एक मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयावरून महाविकास आघाडीत घमासान सुरु झाले.आघाडी सरकारमधील मंत्री अजित पवार आणि नितीन राऊत हे याच मुद्द्यावरून आमनेसामने आले आहेत.
काँग्रेस पक्षाला गृहीत धरू नका, पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात काँग्रेस तडजोड करणार नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं आहे. 2 दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विषयावर बैठक न लावल्यास मंत्रिमंडळ बैठकीत विषय उपस्थित करणार असल्याचं त्यांनी यात म्हटलं आहे. अजित पवार जर मंत्रीमंडळ उपसमितीचे सर्व अधिकार आपल्यालाच आहे असे समजत असतील तर हा उपसमितीचा अपमान असल्याची भूमिका नितीन राऊत यांनी प्रसिद्ध पत्रकात मांडली आहे.
दरम्यान, दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे देखील एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे. “आम्ही याआधीही अनेकदा सांगितलं आहे की हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाहीत. आमच्या नेत्यांनीही तेच सांगितलं आहे. आमची सरकारमध्ये खूप सारी भागीदारी नाहीये. पण सगळ्यांचा समान विकास व्हायला हवा. उद्धवजी किंवा अजित पवार यांच्यासोबत किमान समान कार्यक्रमाच्या आधारावरच आमचं नातं जोडलं गेलं आहे”, असं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, या सर्व मुद्यांमुळे आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही हे अधोरेखित झालं आहे. महाविकास आघाडी सरकार स्थिर असल्याचे काही नेते सांगत असले तरीही तिन्ही पक्षात धुसफूस सुरु असल्याचे समोर आले असून हे मतभेद अजूनही कमी झाले नसल्याचं या वक्तव्यावरून दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- भूम तालुक्यात ऑक्सिजनची कमतरता; गॅस वेल्डिंग दुकानदाराकडून घ्यावे लागले १९ सिलिंडर
- काँग्रेस पक्षाला गृहित धरू नका, आम्ही तुमचे नोकरदार नाहीत, नितीन राऊत यांचा हल्लाबोल
- उमारगयात पुन्हा नियमांचे उल्लंघन; ४३ हजाराचा दंड वसूल!
- सचिनने खराब गोलंदाजी करायला सांगितल्याचा पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूचा खळबळाजनक दावा
- ‘भारतीय संघात शार्दूलला अष्टपैलू खेळाडू म्हणून जागा मिळावी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

