Share

बँकांच्या खासगीकरणामध्ये ‘या’ बँकांचा समावेश असण्याची शक्यता

Published On: 

नवी दिल्ली: केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामण यांनी १ फेब्रुवारीला लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले. यावेळी कोरोना काळात अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांबरोबरच उद्योजकांना देखील दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. तर गेल्या वर्षभरात अर्थव्यवस्थेची होत असलेली पडझड लक्षात घेता यंदाचा अर्थसंकल्प यावर काय उपाययोजना आणणारा ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

यामध्ये सीतारामण यांच्याकडून अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या यामध्ये केंद्र सरकार दोन सरकारी बँका विकणार असल्याची घोषणा सीतारामण यांनी आज केली. त्याचबरोबर एका विमा कंपनीचं तर दोन सरकारी बँकांचे खासगीकरण करण्यात येणार आहे किंवा त्या विकल्या जातील असे यावेळी अर्थमंत्री सीतारमण यांनी जाहीर केले.

गेल्या काही दिवसांपूर्वी पासूनच सरकारकडून देशातील कंपन्या आणि बँका यांच्या खाजगीकरणाच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. आज त्यावर अर्थसंकल्पा दरम्यान शिक्कामोर्तब करण्यात आल आहे. तसेच सरकारी कंपन्यांचे अतिरिक्त भूखंडही विकले जाणार आहेत. तसेच सरकार आयडीबीआय बँकेचेही खासगीकरण करणार असल्याची घोषणा सीतारामण यांनी केली आहे.

यामध्ये IDBI बँकेसह आगामी आर्थिक वर्षात आणखी दोन बँकांचे खासगीकरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये पंजाब अँड सिंध, यूको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसिस बँक यापैकी त्या दोन बँका असू शकतात, असे सांगितले जात आहे. तर मीडिया रिपोर्टनुसार, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांची नावे चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे.

आगामी काळात सरकारी बँकांची संख्या कमी करून खासगीकरणावर भर देण्यात येणार असल्याचे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गतवर्षी १० बँकांचे विलिनीकरण करून त्याचे ४ बँकांत रुपांतर करण्यात आले. आता आणखी काही बँकांतून सरकार निर्गुंतवणूक करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!